भारतीय भाषांमधून वापरा मायक्रोसॉफ्टचा ई-मेल आयडी

0

मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपली ई-मेल सेवा मराठी व हिंदीसह १५ भारतीय भाषांमध्ये वापरण्याची सुविधा युजर्सला प्रदान करण्याची घोषणा केली आहे.

मायक्रोसॉफ्टने आपल्या विविध उत्पादनांसाठी भारतीय भाषांचा सपोर्ट प्रदान केला आहे. यात ‘ऑफिस ३६०’ सह आऊटलुक या ई-मेल सेवेचाही समावेश आहे. यापुढे आता आऊटलुकचे ई-मेल भारतीय भाषांमध्ये वापरता येणार आहे. यात मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, मणिपुरी, पंजाबी, तामिळ, तेलगू, उर्दू, बोडो, डोगरी, कोकणी, मैथिली नेपाळी आणि सिंधी या भाषांचा समावेश आहे. यात युजर्सला आपल्या भाषेतील ई-मेल आयडी वापरता येणार आहे. भारतीय भाषांमधील ई-मेल आयडी वापरण्यासाठी ‘इंटरनॅशनल डोमेन नेम्स’ म्हणजेच ‘आयडीएन’सोबत नोंदणी करणे आवश्यक आहे. मायक्रोसॉफ्टने हे सर्व सोपस्कार पार करून भारतीय युजर्सला आपापल्या भाषांमधील ई-मेल आयडी वापरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here