भारतात लवकरच मिळणार सॅमसंगचा हा टॅबलेट

0
गॅलेक्सी टॅब ए (२०१८) टॅबलेट

सॅमसंगने अलीकडेच अनावरण केलेला गॅलेक्सी टॅब ए (२०१८) हा टॅबलेट लवकरच भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्या येणार असून याचे मूल्य ३० हजारांच्या आसपास राहू शकते.

सॅमसंगने अलीकडेच गॅलेक्सी टॅब ए (२०१८) आणि गॅलेक्सी टॅब एस ४ हे दोन टॅबलेट जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. यातील टॅब एस ४ हे मॉडेल प्रिमीयम श्रेणीतील असले तरी टॅब ए २०१८ हे मॉडेल किफायतशीर या वर्गवारीतील असल्याचे फिचर्सवरूनच दिसून आले होते. या अनुषंगाने भारतीय बाजारपेठेत पहिल्यांदा हेच अर्थात सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए (२०१८) हे मॉडेल लाँच करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. याचे मूल्य ३० हजारांच्या आसपास राहू शकते अशी माहितीदेखील विविध लीक्सच्या माध्यमातून समोर आलेली आहे.

सॅमसंजच्या गॅलेक्सी टॅब ए (२०१८) या मॉडेलमध्ये १०.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजे १९२० बाय १२०० पिक्सल्स क्षमतेचा, १६:१० अस्पेक्ट रेशो असणारा व टिएफटी एलसीडी या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ४५० हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ३ जीबी असून स्टोअरेज ३२ जीबी इतके आहे. हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ४०० जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा दिली आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ८.१ ओरियो या आवृत्तीवर चालणारे आहे. यात यात ७,३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिली आहे. यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असणार आहे. यामध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस या प्रणालीने सज्ज असणारे चार स्पीकर्स दिलेले आहेत. यात ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, जीपीएस, युएसबी टाईप-सी आदी पर्याय दिलेले आहेत. तर अ‍ॅक्सलेरोमीटर, कंपास, गायरोस्कोप, आरजीबी हॉल सेन्सर आदी विविध सेन्सर्सदेखील यामध्ये असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here