भारतात टॅबलेटच्या लोकप्रियतेत घट

0

भारतीय बाजारपेठेत टॅबलेटची लोकप्रियता कमी होत असल्याचे या वर्षीच्या पहिल्या तिमाहीतल्या विक्रीवरून दिसून आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून टॅबलेटची विक्री कमी झाल्याचे दिसून येत आहे. विशेष करून स्मार्टफोनचा आकार मोठा झाला असल्यामुळे आता टॅबलेट खरेदीला फारसे प्राधान्य मिळत नसल्याचे मानले जात आहे. या पार्श्‍वभूमिवर, सायबर मीडिया रिसर्च अर्थात सीएमआर या संस्थेने जानेवारी ते मार्च-२०१८ या तिमाहीतील विक्रीच्या आकडेवारवर आधारित अहवाल सादर केला आहे. यात गेल्या वर्षीच्या याच कालखंडातील टॅबलेटच्या विक्रीपेक्षा यावर्षी तब्बल १० टक्के इतके कमी युनिट विकले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, भारतीय बाजारपेठेवर लेनोव्हो कंपनीने २३ टक्के वाट्यासह पहिला क्रमांक मिळवल्याचे या अहवालात दर्शविण्यात आले आहे. तर २१ टक्के वाट्यासह सॅमसंग कंपनी दुसर्‍या क्रमांकावर विराजमान आहे. मध्यंतरी पहिल्या क्रमांकावर असणार्‍या डाटाविंडला मोठा फटका बसला असून १६ टक्के मार्केट शेअरसह ही कंपनी तिसर्‍या क्रमांकावर आहे. तर आयबॉलचा १३ टक्क्यांसह चौथा क्रमांक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here