ब्ल्यु-टुथ स्पीकरयुक्त लँप

0

इमोई या कंपनीने भारतात ब्ल्यु-टुथ स्पीकर आणि लँप या दोन्ही प्रकारात वापरण्याजोगे मॉडेल सादर करण्याची घोषणा केली आहे.

सध्या भारतीय बाजारपेठेत ब्ल्यु-टुथ कनेक्टिव्हिटी असणारे अर्थात वायरलेस स्पीकर मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. याच्या जोडीला काही कंपन्या अत्यंत आकर्षक असे फिचर्स देत आहेत. यात इमोई कंपनीने स्पीकरमध्येच लँपची सुविधा दिली आहे. या कंपनीने ग्लोब आणि मशरूम हे दोन वायरलेस स्पीकर बाजारपेठेत उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. यांचे मूल्य अनुक्रमे ४,५०० आणि ४,७०० रूपये असले तरी ते सध्या २,९९० रूपये या सवलतीच्या दरात ग्राहकांना ‘येर्‍हा.कॉम’ या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. नावातच नमूद असल्यानुसार या स्पीकरयुक्त लँप स्वरूपातील मॉडेलचा आकार अनुक्रमे पृथ्वीचा गोल आणि मशरूम यानुसार असेल. खरं तर कोणताही वायरलेस स्पीकर हा अगदी कुठेही वापरता येतो. यातच यामध्ये लँप देण्यात आल्यामुळे बेडरूमसह कुठेही रात्री याचा वापर करता येणार आहे.

अन्य ब्ल्यु-टुथ स्पीकरनुसार या दोन्ही मॉडेलमध्ये स्मार्टफोनसह अन्य स्मार्ट उपकरणांमधील संगीताचा आनंद घेता येणार आहे. यासोबत मायक्रो-एसडी कार्ड आणि युएसबी ड्राईव्हमधील संगीतही यावरून ऐकता येण्याची व्यवस्था आहे. यातील ग्लोब मॉडेलमध्ये ऑक्झ-इन पोर्टदेखील देण्यात आले आहे. यात स्मार्टफोन चार्जींगची व्यवस्थादेखील असेल. या दोन्ही वायरलेस स्पीकरमध्ये फास्ट चार्जींगच्या सपोर्टसह १७५० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या दोन्ही मॉडेलमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचे लाईट दिलेले आहेत. विशेष म्हणजे अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालीसाठी सादर करण्यात आलेल्या अ‍ॅप्लीकेशनच्या मदतीने त्याचे स्मार्टफोनवरून नियंत्रण करता येणार आहे.

पहा: ईमोईच्या मशरूम स्पीकरची माहिती देणारा हा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here