ब्रँड प्रमोशनसाठी जिओ इंटरकनेक्ट सेवेची घोषणा

1

रिलायन्स जिओ कंपनीने विविध ब्रँडच्या प्रमोशनसाठी कृत्रीम बुध्दीमत्तेने युक्त असणारी जिओ इंटरकनेक्ट ही सेवा सादर केली आहे.

जिओ इंटरकनेक्ट ही एका प्रकारची व्हिडीओ चॅटबॉट सेवा आहे. याला व्हिसीबीएएएस म्हणजेच व्हिडीओ कॉल बॉट अ‍ॅज अ सर्व्हीस असे संबोधण्यात आले आहे. यात कुणीही सेलिब्रीटी अथवा कंपनी आपापल्या एखादा इव्हेंट, प्रॉडक्ट या चित्रपटाचे प्रमोशन करू शकेल. याच्या अंतर्गत युजर संबंधीत सेलिब्रिटी वा कंपनीला दिवसभरातून केव्हाही व्हिडीओ कॉल करू शकते. यात आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स म्हणजेच कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करण्यात आला आहे. याच्या मदतीने युजर नेमका कोणता प्रश्‍न विचारतोय याचे आकलन करत संबंधीत प्रश्‍नाचे उत्तर त्याला व्हिडीओ कॉलमधून देण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. रिलायन्स जिओ सेवेचे युजर आपल्या माय जिओ अ‍ॅपमधील इंटरकनेक्टच्या आयकॉनवर क्लिक करून ही सेवा कार्यान्वित करू शकतात. यामध्ये मशिन लर्नींग या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. जिओ कंपनीच्या तब्बल १८.६ कोटी युजर्सला याला लाभ घेता येणार आहे.

रिलायन्स जिओ इंटरकनेक्ट सेवा ही अशा प्रकारची ही जगातील पहिलीच सेवा असल्याचे मानले जात आहे. याच्या माध्यमातून कुणीही व्यावसायिक पातळीवर आपले व्हिडीओ कॉल सेंटर उभारू शकतो. यावर एखाद्या प्रॉडक्टचे व्हिडीओ कॅटलॉग अथवा व्हर्च्युअल शो-रूमदेखील उभारता येणार आहे. या सेवेच्या प्रारंभी यावर महानायक अमिताभ बच्चन आपल्या आगामी १०२ नॉट आऊट या चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे. म्हणजे कुणीही युजर अमिताभला व्हिडीओ कॉल करून या चित्रपटाबाबत माहिती विचारू शकतात. युजर्सच्या सर्व प्रश्‍नांना अमिताभ उत्तर देणार आहे. विशेष म्हणजे यावरून संबंधीत चित्रपटाच्या शो ची तिकिटे बुक करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. यासाठी बुक माय शो या कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे अमिताभसोबतची ही व्हिडीओ चॅटींग सोशल मीडियात शेअर करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. याच प्रकारे अन्य कंपन्यांनाही आपापल्या उत्पादनांच्या जाहिराती करण्याची सुविधा यामध्ये देण्यात येणार आहे.

जिओ इंटरकनेक्टचा वापर कसा कराल ?

१) माय जिओ अ‍ॅप डाऊनलोड करा. अथवा आपल्याकडे हे अ‍ॅप आधीच इन्स्टॉल केलेले असल्यास ते ओपन करा.
२) या अ‍ॅपमधील जिओइंटरकनेक्टच्या आयकॉनवर क्लिक करा.
३) यानंतर आपण अमिताभशी व्हिडीओ कॉलवर बोलू शकतात.
४) अमिताभसोबत करण्यात आलेली व्हिडीओ चॅटींग सोशल मीडियात शेअर करण्याची सुविधादेखील यात देण्यात आली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here