बेल्कीनच्या पॉवर बँक्स बाजारपेठेत दाखल

0
बेल्कीन पॉवर बँक्स, belkin power bank

बेल्कीन कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी दोन पॉवर बँक्स सादर करण्याची घोषणा केली असून याला ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीत उपलब्ध केले आहे.

पॉवर बँक्स हा आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. बहुतांश उपकरणांमध्ये चांगल्या दर्जाच्या बॅटरीज असल्या तरी अनेकदा आपल्याला चार्ज करण्यासाठी वेळ मिळत नाही. यामुळे ऐन वेळी बॅटरी दगा देण्याची शक्यता असता. याप्रसंगी पॉवर बँक उपयोगात येत असते. बाजारात सध्या अत्यंत अल्प मूल्यात उत्तमोत्तम दर्जाच्या पॉवर बँक उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तर काही कंपन्यांनी थोडे जास्त मूल्य असणार्‍या प्रिमीयम मॉडेलवर भर दिला आहे. बेल्कीननेही हा मार्ग निवडून प्रिमीयम मॉडेल्स लाँच केले आहेत. यात ५,००० आणि १०,००० मिलीअँपिअर क्षमतांचे दोन मॉडेल्स लाँच करण्यात आले आहेत. यांचे मूल्य अनुक्रमे २,५९९ आणि ३,९९९ रूपये आहे. या दोन्ही पॉवर बँक अमेझॉन इंडियासह देशभरातील निवडक शॉपीजमधून ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.

या दोन्ही मॉडेल्समध्ये पॉलीमर बॅटरी सेल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे यातील बॅटरी ही वजनाने हलकी व आकाराने आटोपशीर अशीच आहे. यामध्ये फास्ट चार्जींगचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. यामुळे जलद गतीने चार्जींग शक्य आहे. यामध्ये तब्बल ६ मायक्रो-युएसबी पोर्ट दिलेले आहेत. यामुळे एकाच वेळी सहा उपकरणांना चार्ज करता येणार आहे. यातील पॉवर लेव्हल नेमकी किती आहे? याची माहिती देण्यासाठी चार एलईडी इंडिकेटर्स देण्यात आले आहेत. या दोन्ही पॉवर बँक आयफोन ७ या मॉडेलला अनुक्रमे ३ आणि ५ वेळेस चार्ज करू शकत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here