बीएसएनएलच्या ग्राहकांना अमेझॉन प्राईमची सेवा मिळणार चकटफू !

0
Amazon-Prime-india

बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना अमेझॉन प्राईमची सेवा एक वर्षापर्यंतची मोफत देण्याची घोषणा केली असून याच्या अंतर्गत असणारे सर्व लाभ मिळणार आहेत.

सध्या टेलकॉमच नव्हे तर अन्य विविध क्षेत्रांमध्ये प्रचंड चुरशीची स्पर्धा सुरू झाली आहे. यामुळे ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी विविध आकर्षक ऑफर्स देण्यात येत आहेत. यातच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अनेक कंपन्या हातमिळवणी करत असल्याचेही दिसून येत आहे. या अनुषंगाने आता बीएसएनएल आणि अमेझॉन इंडिया कंपन्यांनी सहकार्याचा करार करत असल्याचे घोषीत केले आहे. याच्या अंतर्गत बीएसएनएल आता आपले पोस्टपेड प्लॅन घेतलेले ग्राहक तसेच ब्रॉडबँडच्या युजर्ससाठी अमेझॉन प्राईमची एक वर्षापर्यंतची सेवा अगदी मोफत देणार आहेत. अर्थात ३९९ रूपये महिन्यांवरील पोस्टपेड प्लॅनधारक तसेच ७४५ वा त्यापेक्षा जास्त रूपयांचा ब्रॉडबँड प्लॅन असणार्‍या ग्राहकांनाच याचा लाभ मिळणार आहे.

अमेझॉन प्राईम या सेवेसाठी सध्या ९९९ रूपये प्रति-वर्ष इतकी आकारणी करण्यात येते. याच्या अंतर्गत अमेझॉन प्राईम व्हिडीओचा लाभ घेता येतो. प्राईम व्हिडीओ ही स्ट्रीमिंग सेवा सध्या खूप लोकप्रिय झालेली आहे. यात चित्रपटांसह मनोरंजनाचा अजस्त्र खजिना उपलब्ध करण्यात आलेला आहे. याशिवाय अमेझॉन प्राईमची सेवा घेणार्‍याला या ई-कॉमर्स कंपनीतर्फे देशभरात कोठेही अतिशय जलद गतीने व कोणतेही शिपींग चार्जेस न लागता डिलीव्हरी मिळते. याशिवाय प्राईम म्युझिकच्या माध्यमातून कुणीही अमर्याद संगीताचा लाभ घेऊ शकतो तर प्राईम रिडींगच्या अंतर्गत ई-बुक्स वाचन करता येणार आहे. अर्थात बीएसएनएलच्या ग्राहकांना या सर्व सेवा एक वर्षापर्यंत अगदी मोफत मिळणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here