बीएसएनएलचे हॅपी ऑफर प्रिपेड प्लॅन्स

0
BSNL

बीएसएनएलने आता हॅपी ऑफरच्या अंतर्गत आपल्या ग्राहकांसाठी प्रिपेड प्लॅन्स जाहीर केले आहेत.

सेल्युलर कंपन्यांमधील स्पर्धा आता अतिशय तीव्र होत आहे. यामुळे बहुतांश कंपन्या अतिशय उत्तमोत्तम प्लॅन्स सादर करतांना दिसत आहेत. यात सार्वजनीक क्षेत्रातील कंपनी असणार्‍या बीएसएनएलनेही उडी घेत स्पर्धात्मक प्लॅन्स सादर करण्यास प्रारंभ केला आहे. या अनुषंगाने बीएसएनएलतर्फे आता हॅपी ऑफर प्रिपेड प्लॅन्स जाहीर करण्यात आले असून याचे दर १८७ ते ९९९ रूपयांच्या दरम्यानचे आहेत. यातील १८७ रूपयांच्या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. या कालखंडात युजरला अमर्याद स्थानिक आणि एसटीडी कॉलींगसह दररोज १०० एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय, युजरला दररोज एक जीबी याप्रमाणे एकंदरीत २८ जीबी डाटा वापरता येणार आहे. ३४९ रूपयांच्या प्लॅनची मर्यादा ५४ दिवसांची असून यात ग्राहकाला अमर्याद कॉलींगसह दररोज एक जीबी म्हणजेच ५४ जीबी डाटा वापरता येणार आहे. याच्या जोडीला दररोज १०० एसएमएसची सुविधादेखील मिळणार आहे.

बीएसएनएलच्या हॅपी ऑफरमध्ये ४८५ रूपयांचा प्लॅनदेखील असून याची वैधता ८५ दिवसांची आहे. या कालखंडात युजर अमर्याद कॉल आणि दररोज एक जीबी डाटा व १०० एसएमएसचा वापर करू शकतो. ६६६ रूपयांच्या प्लॅनची वैधता १२९ दिवसांची आहे. यात ग्राहकाला दररोज १.५ जीबी डाटा मिळणार असून अमर्याद कॉलींग करता येणार आहे. तर ९९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये १८१ दिवसांपर्यंत युजर अमर्याद कॉल करू शकतो. यात त्याला दररोज १ जीबी डाटा आणि १०० एसएमएस मिळणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here