बीएसएनएलचे गतीमान ऑप्टीकल ट्रान्सपोर्ट नेटवर्क

0
BSNL

बीएसएनएलने डिजीटल इंडियाच्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी १००-जी ऑप्टीकल ट्रान्सपोर्ट नेटवर्क कार्यान्वित करण्याची घोषणा केली आहे.

केंद्र सरकारने डिजीटल इंडिया मोहिमेच्या अंतर्गत २०१८च्या अखेरीस देशातील अडीच लाख ग्रामपंचायतींना ऑप्टीकल फायबरच्या मदतीने गतीमान इंटरनेटशी कनेक्ट करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यात आतापर्यंत सुमारे एक लाख ग्रामपंचायतींना ही सुविधा पुरविण्यात आली असून उर्वरित कामासाठी बीएसएनएलचे नुकतेच कार्यान्वित झालेले १००-जी ऑप्टीकल ट्रान्सपोर्ट नेटवर्क उपयोगात येणार आहे. तसेच या नेटवर्कमुळे केंद्र सरकारच्या भारतनेट, स्वान, एनकेएन आदी प्रोजेक्टलाही गती मिळणार आहे.

बीएसएनएलने आजवर देशात १०-जी क्षमतेचे ऑप्टीकल ट्रान्सपोर्ट नेटवर्क होते. आता याची क्षमता तब्बल दहा पटींनी वाढणार आहे. याच्या मदतीने ग्राहकांना गतीमान सेवा पुरवता येईल. यात मोबाईल इंटरनेट, ब्रॉडबँड, लीज लाईन आदी सेवांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here