बीएसएनएलचा ४९१ रूपयांचा ब्रॉडबँड प्लॅन

0
bsnl broadband,बीएसएनएल ब्रॉडबँड

बीएसएनएलने ब्रॉडबँड युजर्ससाठी ४९१ रूपयांचा नवीन प्लॅन जाहीर केला असून देशभरातील सर्व सर्कल्समध्ये याला कर्यान्वित करण्यात आले आहे.

देशात सध्या इंटरनेटची गती आणि किफायतशीर प्लॅन्स याबाबत टेलकॉम कंपन्यांमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. यात फोर-जी डाटा प्लॅन्ससह ब्रॉडबँड इंटरनेटचाही समावेश आहे. अल्प मूल्यात उत्तमोत्तम फिचर्स देण्याकडे बहुतांश कंपन्यांचा कल आहे. या अनुषंगाने बीएसएनएलने ४९१ रूपये प्रति-महिना या दराने नवीन ब्रॉडबँड प्लॅन सादर केला आहे. रिलायन्सने अलीकडेच जाहीर केलेल्या जिओ गिगाफायबरची सेवा अजून कार्यान्वित झालेली नाही. मात्र ही सेवा ग्राहकांना प्रचंड प्रमाणात आकर्षीत करणार असल्याची बाब लक्षात घेत बीएसएनएलने हा प्लॅन लाँच केल्याची बाब उघडपणे दिसून येत आहे.

या नवीन प्लॅनमध्ये ग्राहकाला तब्बल २० मेगाबाईट प्रति-सेकंद इतक्या गतीने ब्रॉडबँड इंटरनेट मिळणार आहे. ग्राहक दररोज २० जीबी अर्थात महिन्याला तब्बल ६०० जीबी डाटा या प्रकारात वापरू शकतो. यानंतर एफयुपी नियमाच्या आधारे ग्राहक २ मेगाबाईट प्रति-सेकंद या गतीने इंटरनेटचा वापर करू शकतो. अर्थात दररोज २० जीबी डाटाची मर्यादा संपली तरी तो या गतीने अमर्याद इंटरनेट वापरू शकतो. दरम्यान, यासोबत बीएसएनएलने अमर्याद स्थानिक तसेच एसटीडी कॉलींगची सुविधादेखील जाहीर केली आहे. दरम्यान, रिलायन्सची जिओ गिगाफायबर सेवा कार्यान्वित होण्याआधीच गत महिन्यात बीएसएनएलने फायबर टू द होम अर्थात एफटीटीएच ही ऑप्टीकल फायबरयुक्त ब्रॉडबँड सेवा सुरू केली आहे. यामध्ये अत्यंत किफायतशीर दरात ग्राहकांना ५० व १०० मेगाबाईट प्रति-सेकंद इतक्या गतीने इंटरनेटची सेवा देण्यात येत आहे. यासाठी ७७७ रूपयांपासून विविध प्लॅन्सदेखील सादर करण्यात आले आहेत. अर्थात या स्पर्धेत बीएसएनएलने आघाडी घेतली तरी यामध्ये प्रत्यक्षात जिओचे आगमन झाल्यानंतर याला कायम ठेवता येणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here