बीएमडब्ल्यू एक्स३ एक्स३० आय बाजारपेठेत दाखल

0

बीएमडब्ल्यू कंपनीने एक्स३ एक्स३० आय हे नवीन मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

बीएमडब्ल्यू एक्स३ एक्स३० आय या मॉडेलचे दिल्लीतील एक्स-शोरूम मूल्य ५६.९० लाख रूपये इतके आहे. ही कार आधीच बाजारपेठेत असणार्‍या एक्स ३ या मॉडेलची पुढील आवृत्ती असून यात फक्त पेट्रोल इंजिनाचा पर्याय देण्यात आला आहे. यात २.० लीटर क्षमतेचे ट्विन टर्बोचार्ज्ड फोर-सिलेंडर इंजिन प्रदान करण्यात आले आहे. याला ८-स्पीड स्टेप्ट्रॉनिक्स गिअर्सची जोड देण्यात आली आहे. हे मॉडेल ० ते १०० किलोमीटर प्रति-तास हा वेग अवघ्या ६.३ सेकंदात गाठण्यास सक्षम असल्याचा दावा बीएमडब्ल्यू कंपनीने केला आहे. यामध्ये १९ इंची अलॉय व्हील्स प्रदान करण्यात आले आहेत. यात क्रोम ग्रील दिले असून आतील भागात लेदरने युक्त सजावट प्रदान करण्यात आली आहे. यात वायरलेस चार्जींगची सुविधा देण्यात आली आहे. तसेच यामध्ये ऑटो स्टार्ट-स्टॉप, पार्क असिस्ट प्रणालीसह रिअर कॅमेरादेखील असेल. यात सुरक्षेसाठी सहा एयरबॅग्ज प्रदान करण्यात आल्या आहेत. याच्या जोडीला कॉर्नरींग ब्रेक कंट्रोलयुक्त डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ऑटो होल्डयुक्त इलेक्ट्रीक पार्कींग ब्रेक, आयसीफिक्स चाईल्ड माऊंटींग सिस्टीम, क्रॅश सेन्सर, इलेक्ट्रॉनिक व्हेईकल इम्मोबीलायझर आदी फिचर्सदेखील यामध्ये असतील. तर यामध्ये चार ड्रायव्हींग मोड देण्यात आले आहेत.

बीएमडब्ल्यू एक्स३ एक्स३० आय हे मॉडेल मर्सडिझ-बेंझ जीएलसी ३०० व रेंजरोव्हर इव्होक एसई पेट्रोल या वाहनांना तगडे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here