बजाज ऑटोच्या नवीन डिस्कव्हर ११० व १२५ चे आगमन

0

बजाज ऑटोने आपल्या डिस्कव्हर ११० आणि डिस्कव्हर १२५ या दुचाकींची अद्ययावत आवृत्ती भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

बजाज ऑटो कंपनीने २००४ साली पहिल्यांदा डिस्कव्हर हा ब्रँड लाँच केला होता. तेव्हापासून कंपनीच्या सर्वात जास्त विकल्या जाणार्‍या दुचाकींमध्ये डिस्कव्हरचा समावेश आहे. आकर्षक लूक आणि उत्तम परफॉर्मन्समुळे याला ग्राहकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील डिस्कव्हर ११० आणि डिस्कव्हर १२५ या मॉडेल्सचे नवीन व्हेरियंट आता बाजारपेठेत उतारण्यात आले आहे. यात आधीच्या मॉडेल्सपेक्षा काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यातील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे डबल एलईडी डीआरएल (डे-टाईम रनींग लँप) होय. अनेक उच्च श्रेणीतील बाईक्समध्ये असलेले हे फिचर आता डिस्कव्हर दुचाकींना प्रदान करण्यात आले आहे. तसेच यात डिजीटल स्पीडोमीटर देण्यात आले असून हेदेखील या वर्गवारीत प्रथमच असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

बजाज ऑटोच्या नवीन डिस्कव्हर ११० आणि डिस्कव्हर १२५ सीसी मॉडेल्समध्ये अनुक्रमे फोर-स्ट्रोक, एयर कुल्ड व सिंगल सिलेंडर या प्रकारातील अनुक्रमे ११५.५ आणि १२४.५ सीसी क्षमतांचे इंजिन देण्यात आले आहे. या दोन्ही मॉडेल्समध्ये १६ टक्के अधिक लांब असणारे सस्पेन्शन आणि आरामदायी सीट दिलेले आहे. दोन्ही दुचाकी काळा, लाल आणि निळा या तीन रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत. बजाज ऑटोच्या डिस्कव्हर ११० चे एक्स-शोरूम मूल्य ५०४९६ रूपये आहे. तर डिस्कव्हर १२५ च्या ड्रम आणि डिस्क व्हेरियंटचे मूल्य अनुक्रमे ५३,४९१ आणि ५६,३१४ रूपये इतके असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here