फ्लिपकार्टवरून ९९ रूपये महिन्याने खरेदी करा लॅपटॉप

0

फ्लिपकार्ट या आघाडीच्या ई-कॉमर्स कंपनीने ९९९ रूपयांच्या हप्त्याने लॅपटॉप खरेदी करण्याची सुविधा देणारी योजना जाहीर केली आहे.

फ्लिपकार्टच नव्हे तर अन्य सर्व ई-शॉपिंग पोर्टलवर इएमआयच्या मदतीने विविध उत्पादने खरेदी करण्याची सुविधा आहे. मात्र यात मर्यादीत हप्त्यांची अट टाकण्यात आलेली असते. या पार्श्‍वभूमिवर फ्लिपकार्टने जाहीर केलेली योजना नवीन लॅपटॉप खरेदी करणार्‍यांसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. फ्लिपकार्टने मायक्रोसॉफ्ट, इंटेल आणि एचपी या कंपन्यांसोबत करार करून याची घोषणा केली आहे. या संदर्भात आयसीआयसीआय बँक आणि सिटीबँकची मदत घेण्यात आली आहे. याच्या अंतर्गत एचपी इंप्रिंट हा लॅपटॉप मासिक ९९९ रूपयांच्या ३६ इएमआयमध्ये खरेदी करता येणार आहे. या मॉडेलमध्ये इंटेलचा कोअर आय-३ हा प्रोसेसर असून हे मॉडेल विंडोज १० या प्रणालीवर चालणारे आहे. या मॉडेलचे मूल्य ३५,९५४ रूपये आहे. अर्थात तब्बल तीन वर्षापर्यंत इएमआय असूनही यावर व्याज लावण्यात आलेले नाही हे विशेष. फ्लिपकार्टने आधीच बॅक टू कॉलेज या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना खास सवलत देत उपकरणे खरेदी करण्याची सुविधा दिली आहे. ९९९ रूपयांचा इएमआय हा याच योजनेचा विस्तार मानला जात आहे. फ्लिपकार्टवर लॅपटॉप खरेदीचा वेग वार्षिक ३० टक्क्यांनी वाढत आहे. या पार्श्‍वभूमिवर फ्लिपकार्टने यावरच लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने अन्य लॅपटॉप सुध्दा अशा सवलतीच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येतील असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here