फ्लिपकार्टवरून मिळणार लेनोव्होचे फिटनेस बँड

0

लेनोव्हो कंपनीने एचएक्स०३ कार्डीओ आणि एचएक्स०३एफ स्पेक्ट्रा हे दोन फिटनेस बँड सादर केले असून ते ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहेत.

लेनोव्हो एचएक्स०३ कार्डीओ या मॉडेलमध्ये हार्ट रेट ट्रॅकर इनबिल्ट अवस्थेत देण्यात आले आहे. यात स्टॅटीक आणि डायनॅमिक या दोन्ही पध्दतीत हृदयाच्या ठोक्यांचे मापन करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात स्मार्टफोनवरील विविध नोटिफिकेशन्स पाहता येतात. यासाठी यामध्ये ०.९६ इंच आकारमानाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. निद्रेचे मापन करण्यासाठी यामध्ये स्लीप ट्रॅकर प्रणाली देण्यात आली आहे. तसेच यामध्ये अलार्म क्लॉकची सुविधादेखील दिलेली आहे. यामध्ये ८५ मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १० दिवसांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे.
लेनोव्हो एचएक्स०३एफ स्पेक्ट्रा या मॉडेलमध्ये १६० बाय ८० पिक्सल्स क्षमतेचा टिएफटी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यामध्येही आधीच्या मॉडेल्सनुसारच सर्व फंक्शन्स देण्यात आले आहेत. याच्या जोडीला या ट्रॅकरसोबत बदलता येणारे विविध पट्टेदेखील दिलेले आहेत. तसेच यात आरोग्याच्या विविध बाबींवर अतिशय अचूकपणे लक्ष ठेवणारा इंटिलेजीयंट असिस्टंटदेखील प्रदान करण्यात आला आहे. दोन्ही मॉडेल वॉटरप्रूफ असल्यामुळे याला पाण्यातदेखील सहजपणे वापरता येणार आहे. तसेच या दोन्ही मॉडेल्ससाठी कंपनीने अँड्रॉइड व आयओएस प्रणालीच्या युजर्ससाठी अ‍ॅप्लीकेशन तयार केले असून याच्या माध्यमातून याला स्मार्टफोन कनेक्ट करता येणार आहे.

लेनोव्हो एचएक्स०३ कार्डीओ आणि एचएक्स०३एफ स्पेक्ट्रा या दोन्ही मॉडेल्सचे मूल्य अनुक्रमे १,९९९ आणि २,२९९ रूपये आहे. यातील पहिल्या ट्रॅकरची आधीच विक्री सुरू झाली असून दुसरे मॉडेल ३ मे पासून मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here