फ्लिपकार्टवरून मिळणार ऑनरचे टॅबलेट

0

ऑनरने मीडियापॅड टी ३ आणि मीडियापॅड टी ३ १० हे दोन टॅबलेट बाजारपेठेत सादर केले असून ते ग्राहकांना फ्लिपकार्टवरून मिळणार आहे.

हुआवेची मालकी असणार्‍या ऑनरच्या मीडियापॅड मालिकेतील मीडियापॅड टी ३ व मीडियापॅड टी ३ १० हे दोन्ही मॉडेल्स क्वॉलकामॅच्या क्वॉड-कोअर स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसरवर चालणारे आहेत. यात ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. हे दोन्ही टॅबलेट फोर-जी एलटीई नेटवर्क कनेक्टीव्हिटीने सज्ज आहे. तसेच यात वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, युएसबी आदी फिचर्स दिलेले आहेत. दोन्हींमधील मुख्य व फ्रंट कॅमेरे अनुक्रमे ५ व २ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. हे दोन्ही टॅबलेट अँड्रॉडइच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा एमआययुआय ५.१ हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे.

मीडियापॅड टी ३ या मॉडेलमध्ये आठ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. ऑनर मीडियापॅड टी ३ १० या मॉडेलमध्ये ९.६ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्सचा (एचडी) डिस्प्ले असेल. याची रॅम २/३ जीबी आणि १६/३२ जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट असून यामध्ये मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत स्टोअरेज वाढविता येणार आहे. मीडियापॅड टी ३ हा टॅबलेट १२९९९ रूपये मूल्यात तर मीडियापॅड टी ३ १० या मॉडेलचे २ आणि ३ जीबी रॅमचे व्हेरियंट अनुक्रमे १४,९९९ आणि १६,९९९ रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे. काही दिवसांपूर्वी हे दोन मॉडेल्स घोषीत करण्यात आले होते. आता हे टॅबलेट उपलब्ध करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here