फ्लिपकार्टवरूनच मिळणार अल्काटेलचे टॅबलेट

0

अल्काटेल कंपनीने आपले सर्व टॅबलेट फक्त फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरूनच मिळणार असल्याची घोषणा नुकतीच केली आहे.

अल्काटेल हा टिसीएल या कंपनीची मालकी असणारा ब्रँड आहे. स्मार्टफोन व टॅबलेटच्या क्षेत्रात अल्काटेलने भारतीय बाजारपेठेत विविध उत्पादने सादर केली आहेत. आता यापुढे कंपनीचे सर्व टॅबलेट हे फक्त फ्लिपकार्ट या ई-पोर्टलवरूनच ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आल्याची माहिती कंपनीतर्फे सीईएस-२०१८ या प्रदर्शनात करण्यात आली आहे. मुळातच टॅबलेट निर्मितीत अनेक मातब्बर कंपन्या असतांना अल्काटेलने उत्तम कामगिरी बजावली आहे. किफायतशीर मूल्यात अनेक उत्तमोत्तम टॅबलेट सादर करण्याला या कंपनीने सातत्याने प्राधान्य दिले आहे. यामुळे अल्काटेलचे टॅबलेट लोकप्रिय झाले आहेत. अगदी फ्लिपकार्टवर मोठ्या स्क्रीनच्या प्रकारात विकल्या जाणार्‍या टॅबलेट मॉडेल्समध्ये अल्काटेलचा वाटा तब्बल १५.१ टक्के असल्याचे अलीकडच्या आकडेवारीतून समोर आले आहे. आगामी काळात याच पध्दतीच्या कामगिरीची कंपनीला अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here