फ्लिपकार्टचे एयर कंडिशनर व स्मार्ट टिव्ही

0
फ्लिपकार्ट, flipkart

फ्लिपकार्टने आता भारतीय ग्राहकांना आपल्या मार्क्यू या नावाने एयर कंडिशनर आणि स्मार्ट टिव्ही सादर करण्याची घोषणा केली आहे.

फ्लिपकार्ट या देशातील आघाडीच्या शॉपींग पोर्टलने आधी किरकोळ अ‍ॅसेसरीजच्या उत्पादनात प्रवेश केला. यानंतर अलीकडेच कंपनीने स्मार्टफोनही लाँच केला. यातच आता ही कंपनी मार्क्यू (MarQ) या नावाने एयर कंडिशनर आणि स्मार्ट टिव्हीदेखील भारतीय ग्राहकांना विकणार आहे. यासाठी फ्लिपकार्टने लील इलेक्ट्रॉनिक (पूर्वाश्रमीची लॉइड इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड) या कंपनीशी सहकार्याचा करार केला आहे. या अनुषंगाने भारतीय ग्राहकांसाठी इनोकुल या मालिकेतील एयर कंडिशनर सादर करण्यात येणार आहेत. हे एसी १ आणि १.५ टन क्षमतेच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात येतील. याला ३-स्टार मानांकन मिळाले असून यात इन्व्हर्टर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे हे एसी तुलनेत कमी उर्जा वापरतील असा दावा फ्लिपकार्ट कंपनीने केला आहे. एप्रिल महिन्यात याचे चार मॉडेल्स ग्राहकांना सादर करण्यात येतील. तर मे महिन्यात कंपनीचे स्मार्ट टिव्ही ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहेत. या स्मार्ट टिव्हींचा डिस्प्ले हा एचडी रेडी या प्रकारातील असून ते अँड्रॉइड प्रणालीवर चालणारे असतील असे कंपनीने जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here