फॉक्सवॅगन व्हेंटोची स्पोर्टस् आवृत्ती

0

फॉक्सवॅगन कंपनीने आपल्या व्हेंटो या मॉडेलची स्पोर्टस् या नावाने नवीन आवृत्ती सादर केली असून ग्राहकांना हे मॉडेल पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

फॉक्सवॅगन व्हेंटो या मॉडेलची स्पोर्टस् आवृत्ती भारतीय ग्राहकांना आता खरेदी करता येणार आहे. याचे पेट्रो मॅन्युअल व्हेरियंट-११.४४ लाख; पेट्रोल अ‍ॅटोमॅटीक व्हेरियंट-१२.७९ लाख; डिझेल मॅन्युअल-१२.९२ लाख तर डिझेल अ‍ॅटोमॅटीक १४.१७ लाख रूपयांमध्ये (दिल्लीतील एक्स-शोरूम मूल्य) उपलब्ध करण्यात आले आहेत. या नवीन आवृत्ती उत्तम दर्जाचे एलईडी हेडलँप्स व डे-टाईम रनिंग लँप्स देण्यात आले आहेत. तसेच यामध्ये इलेक्ट्रॉनिक पध्दतीने अ‍ॅडजस्ट होणारे फोल्डींग मिरर्स, दर्जेदार टचस्क्रीन इन्फोटेनमेंट प्रणाली, रिअर पार्कींग कॅमेरा, १६ इंची अलॉय व्हिल्स आदी फिचर्सदेखील देण्यात आले आहेत. तर यात ड्युअल टोन या प्रकारातील रंगसंगती दिलेली आहे.

फॉक्सवॅगन व्हेंटोच्या स्पोर्टस् आवृत्तीत १.६ लीटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन ५ स्पीड मॅन्युअल तसेच ड्युअल क्लच अ‍ॅटोमॅटीक गिअर्सला संलग्न केलेले असेल. तर याचप्रमाणे यातील १.५ लीटर क्षमतेचे डिझेल इंजिनला ५ स्पीड मॅन्युअल व ड्युअल क्लच अ‍ॅटोमॅटीक गिअर्सचे पर्याय देण्यात आले आहेत. मारूती सुझुकी सियाझ, होंडा सिटी आणि हुंदाई वेर्ना या मॉडेल्सला फॉक्सवॅगन व्हेंटोच्या स्पोर्टस् एडिशनचे आव्हान असेल असे तज्ज्ञांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here