फेस आयडीयुक्त नवीन आयपॅड प्रो मॉडेलची घोषणा

0
फेस आयडीयुक्त नवीन आयपॅड प्रो,apple-ipad-pro-2018

फेस आयडीसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणार्‍या नवीन आयपॅड प्रो या मॉडेलची अ‍ॅपल कंपनीने घोषणा केली असून याचे अनावरण करण्यात आले आहे.

अलीकडेच नवीन आयफोन्सची घोषणा केल्यानंतर अ‍ॅपल कंपनीने आपल्या लाँचींग कार्यक्रमात विविध नवीन उपकरणांची घोषणा केली. यात आयपॅड प्रो (२०१८) या टॅबलेटलाही जाहीर करण्यात आले. यात एकाहून एक सरस फिचर्सचा समावेश आहे. यातील लक्षणीय फिचर म्हणजे फेस आयडी हे होय. आधीपासून याला आयफोन्सच्या विविध मॉडेल्समध्ये प्रदान करण्यात आलेले असले तरी पहिल्यांदाच याचा समावेश आयपॅडमध्ये करण्यात आलेला आहे. अर्थात युजरच्या चेहर्‍याच्या बायमॅट्रीक ऑथेंटीकेशन प्रणालीतून हे मॉडेल अनलॉक होणार आहे. यातील फ्रंट कॅमेर्‍याच्या मदतीने याचा वापर करता येणार आहे. लँडस्केप आणि पोटेर्र्ट या दोन्ही मोडमध्ये फेस आयडीचा वापर करता येणार आहे. अर्थात, यात टच आयडी या फिचरचा समावेश करण्यात आलेला नाही. याशिवाय, यात डाटा ट्रान्सफर आणि चार्जींगसाठी युएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आलेले आहे. आयपॅडमध्ये याचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आल्याची बाबदेखील लक्षणीय आहे.

आयपॅड प्रो (२०१८) या मॉडेलमध्ये ११ आणि १२.९ इंच आकारमानाच्या डिस्प्लेंचे पर्याय देण्यात आलेले आहेत. हे डिस्प्ले रेटीना एलसीडी आणि एज-टू-एज या प्रकारातील आहेत. याची क्षमता २३८८ बाय १६६८ पिक्सल्स असून यामध्ये प्रो-मोशन टेक या प्रणालीचा वापर करण्यात आलेला आहे. या मॉडेलमध्ये अ‍ॅपलचा ए१२एक्स बायोनिक प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस १२ तर पुढे ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. यात स्टोअरेजसाठी ६४ जीबींपासून ते १ टिबीपर्यंत पर्याय दिलेले आहेत. यासोबत नवीन अ‍ॅपल पेन्सीलदेखील सादर करण्यात आलेली आहे. दुसर्‍या पिढीतील ही पेन्सील अतिशय कार्यक्षम असून याच्या मदतीने रेखाटन करण्यासह नोटस् घेता येणार आहेत. यामध्ये वायरलेस चार्जींगची सुविधा देखील दिलेली आहे.

आयपॅड प्रो (२०१८) हे मॉडेल लवकरच भारतात मिळणार असून याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य ८९,९०० रूपयांपासून सुरू होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. तर नवीन अ‍ॅपल पेन्सील १०,९९० रूपयात मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here