फेसबुक मॅसेंजर किडस् गुगल प्ले स्टोअरवर दाखल

0

खास बालकांसाठी विकसित करण्यात आलेले फेसबुक मॅसेंजर किडस् अ‍ॅप आता अँड्रॉइड प्रणालीसाठीदेखील सादर करण्यात आले असून गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले आहे.

फेसबुकतर्फे गत डिसेंबर महिन्याच्या प्रारंभी मॅसेंजर किडस् अ‍ॅप सादर करण्यात आले होते. नावातच नमूद असल्यानुसार ही फेसबुक मॅसेंजरची खास मुलांसाठी असणारी आवृत्ती आहे. ६ ते १३ या वयोगटासाठी हे मॅसेंजर असेल. यात लॉगीन करण्यासाठी पालकाच्या अकाऊंटची आवश्यकता असेल. म्हणजेच यात मुलांचे पालक या अ‍ॅपसाठी लॉगीन करतील. यानंतर या अ‍ॅपवर पालकांचेच नियंत्रण असेल. म्हणजेच त्यांनी कुणाशी चॅटींग करावी आणि कुणाशी नाही? हे पालकच ठरवतील. तसेच हे अ‍ॅप इन्स्टॉल करण्यासाठी मुलांना स्वतंत्र अकाऊंटची आवश्यकत नाही. तर पालकांच्या अकाऊंटवरूनच याला इन्स्टॉल करता येणार आहे. यानंतर पालक आपल्या मुलांनी कुणाशी संपर्क करावा याची यादी निश्‍चित करू शकतात. त्यांनी अ‍ॅप्रुव्ह केलेल्या लोकांशी या मॅसेंजरवरून चॅटींग करता येईल. यात वैयक्तीक आणि ग्रुप या दोन्ही प्रकारच्या चॅटींगची सुविधा दिलेली आहे. चॅटींगमध्ये शब्द, प्रतिमा, इमोजी, अ‍ॅनिमेशन्स, व्हिडीओ, स्टीकर्स आदींचा समावेश असेल. या सर्व बाबी खास बालकांसाठी विकसित केलेल्या आहेत. म्हणजेच यात अ‍ॅडल्ट कंटेंट नसेल. तसेच मॅसेंजर किडस् अ‍ॅपमध्ये जाहिरातीदेखील नसतील. आधी हे अ‍ॅप आयओएस प्रणालीसाठी सादर करण्यात आले होते. आता हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here