फेसबुक मॅसेंजरवरील असिस्टंट होणार बंद

0
facebook-messenger

फेसबुकने आपला एम हा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट बंद करण्याची घोषणा केली असून १९ जानेवारीनंतर फेसबुक मॅसेंजरवरील याचे कार्यान्वयन थांबेल.

फेसबुक कंपनीने आपल्या मॅसेंजरच्या युजर्ससाठी एम या नावाने व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट देण्याची ऑगस्ट २०१५ मध्ये घोषणा केली होती. प्रारंभी याची चाचणी घेण्यात आली होती. तर एप्रिल २०१७ पासून जगभरातील युजर्सला एम हा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट प्रदान करण्यात आला होता. एमम हा व्हर्च्युअल असिस्टंट आर्टीफिशियल इंटिलेजियन्स अर्थात कृत्रीम बुध्दीमत्तेसह मानवी सहाय्यकांनी सज्ज आहे. मॅसेंजरचा युजर हा समोरच्या व्यक्तीशी चॅटींग करत असतांना शब्द सुचविण्यासह तो किरकोळ स्वरूपाची कामे करण्यास सक्षम आहे. उदाहरणार्थ कुणी चित्रपटाबाबत चर्चा करत असल्यास तो जवळच्या सिनेमागृहातील चित्रपटाच्या शोची माहिती देत त्याची तिकिटे खरेदी करण्याचे सुचवतो. याशिवाय तो एकमेकांना त्यांचे अचूक लोकेशनही शेअर करण्यास सक्षम आहे. मात्र हा डिजीटल असिस्टंट फेसबुक मॅसेंजरच्या युजर्सच्या पसंतीस उतरला नाही. बर्‍याचशा युजर्सला या प्रकारचा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट असल्याचे आजवर माहितही नव्हते. अर्थात युजर्समध्ये हा असिस्टंट फारसा लोकप्रिय झाला नसल्याचे फेसबुकने याला बंद करण्याची घोषणा केल्याचे मानले जात आहे. १९ जानेवारीपासून एम या व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंटचा सपोर्ट काढण्यात येणार असल्याची घोषणा फेसबुकतर्फे करण्यात आली आहे. एम हा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट फेसबुक मॅसेंजरवरून निरोप घेत असला तरी काही दिवसांनी याला वेगळ्या नावाने रिलाँच करण्यात येईल अशी शक्यतादेखील काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here