फेसबुक मॅसेंजरची अद्ययावत आवृत्ती : जाणून घ्या सर्व बदल

0
facebook-messenger

फेसबुक मॅसेंजरने आपल्या जगभरातील युजर्ससाठी नवीन आवृत्ती सादर केली असून यामध्ये अनेक नवीन बदल करण्यात आलेले आहेत.

फेसबुक मॅसेंजरच्या नवीन आवृत्तीची चाहूल कधीपासूनच लागली होती. याबाबत अनेक लीक्सदेखील समोर आले होते. या पार्श्‍वभूमिवर, आता याची नवीन आवृत्ती सादर करण्यात आली आहे. फेसबुक मॅसेंजर ४ या नावाने हे अपडेट युजर्ससाठी सादर करण्यात आले असून यात आधीपेक्षा काही बदल करण्यात आलेले आहेत. यातील सर्वात लक्षणीय बदल म्हणजे याचा युजर इंटरफेस हा अतिशय सुलभ करण्यात आलेला आहे. आधीपेक्षा आता मॅसेंजर हा सुटसुटीत दिसणार आहे. यामध्ये आधी ९ टॅब (विभाग) असले तरी नवीन आवृत्तीत फक्त चॅट, पीपल आणि डिस्कव्हर या तीन टॅब असणार आहेत. नावातच स्पष्ट असल्यानुसार चॅटच्या माध्यमातून चॅटींग तर पीपलच्या माध्यमातून मित्रांचा शोध घेता येणार आहे. तर डिस्कव्हर या भागाच थोड्या जास्त बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. यात गेम्स, विविध डील्स आदींसह अन्य घटकांचा समावेश असणार आहे. तर याच्या वरील भागात कॅमेर्‍याचा आयकॉन असेल. यावर क्लिक करून कुणीही प्रतिमा, सेल्फी आदींना सहजपणे शेअर करू शकणार आहेत.

फेसबुक मॅसेंजरची विविध बदल असणारी ही नवीन आवृत्ती आता जगभरातील अँड्रॉइड, आयओएस आणि वेब आवृत्तीच्या युजर्ससाठी सादर करण्यात आली आहे. युजर्सला क्रमाक्रमाने अपडेटच्या माध्यमातून याला प्रदान करण्यात येत आहे. अलीकडेच फेसबुक मॅसेंजरवर डार्क मोड येणार असल्याची माहिती समोर आली होती. या अपडेटमध्ये हे फिचर कार्यान्वित करण्यात आलेले नाही. मात्र यालादेखील लवकरच लागू करण्यात येईल असे मानले जात आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here