फेसबुकवर व्हिडीओ कार्यक्रमांसाठी स्वतंत्र विभाग

0

फेसबुकने आपल्या युजर्सला विविध व्हिडीओ कार्यक्रमांना एकाच ठिकाणी पाहता यावे यासाठी वॉच या नावाने स्वतंत्र विभाग देण्याची घोषणा केली आहे.

फेसबुकने व्हिडीओजवर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत केल्याची बाब कुणापासून लपून राहिलेली नाही. या सोशल साईटवर मोठ्या प्रमाणात लाईव्ह आणि रेकॉर्डेड व्हिडीओ पाहिले जातात. गुगलची मालकी असणार्‍या युट्युबला मात देण्यासाठी फेसबुक पध्दतशीरपणे प्रयत्न करत असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमिवर, गेल्या काही महिन्यांपासून फेसबुक स्वत: काही टिव्ही शोजची निर्मिती करणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत ऑगस्ट महिन्यात घोषणा होणार असल्याचेही मानले जात होते. मात्र याआधीच फेसबुकने याच्याशीच संबंधीत एका महत्वपूर्ण फिचरची घोषणा केली आहे. यानुसार आता फेसबुकच्या युजर्सला वॉच या नावाने स्वतंत्र टॅब (विभाग) देण्यात येत आहे. यात ओरिजनल व्हिडीओ (उदा. दूरचित्रवाणी कार्यक्रम, विविध स्पर्धांचे लाईव्ह शोज आदी.) एकाच ठिकाणी पहावयास मिळतील. या सोशल साईटवर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र मूळ स्त्रोत ज्ञात नसणार्‍या व्हिडीओजला यावर स्थान दिले जाणार नसल्याचे फेसबुकने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे.

फेसबुकच्या वॉच या विभागात काही उपविभाग असतील. यात मोस्ट टॉक्ड अबाऊट या उपविभागात ज्या व्हिडीओजवर सर्वाधीक चर्चा सुरू असेल त्यांची लिस्टींग असेल. व्हाट मेकिंग पीपल लॉफ यात कॉमेडी व्हिडीओ शोजचा अंतर्भाव असेल. तर व्हाटस फ्रेंडस आर वॉचिंग या विभागात संबंधीत युजरच्या मित्रांच्या यादीतील वापरकर्ते पाहत असणार्‍या व्हिडीओजला दर्शविण्यात येणार आहे. यातील प्रत्येक शोमध्ये प्रतिक्रिया देण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात वॉचलिस्टच्या माध्यमातून हव्या त्या कार्यक्रमांची लिस्टींग करण्याची सोयदेखील असेल. हा विभाग वेब, संगणक आणि स्मार्टफोन या दोन्ही प्रकारे फेसबुकचा वापर करणार्‍यांना मिळणार आहे. सध्या अमेरिकेतील मर्यादीत युजर्सला वॉच हे फिचर देण्यात आले असून येत्या काही दिवसात भारतातह अन्य देशांमधील वापरकर्त्यांनाही याला प्रदान करण्यात येईल असे फेसबुकतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

पहा फेसबुकच्या वॉच या फिचरची माहिती देणारा व्हिडीओ.

Introducing Watch

Posted by Facebook on Wednesday, August 9, 2017

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here