फेसबुकवर व्हाईस पोस्टसह तीन विशेष फिचर्स

0

फेसबुकने खास भारतीय युजर्ससाठी व्हाईस पोस्ट ही सुविधा सादर केली असून याच्या जोडीला अजून दोन नवीन फिचर सादर केले आहे.

फेसबुकने गत काही दिवसांपासून जाणीवपूर्वक भारतीय युजर्ससाठी विविध फिचर्स लाँच केले आहेत. या अनुषंगाने आज खास भारतीय युजर्ससाठी तीन फिचर सादर करण्यात आले आहेत. यातील सर्वात महत्वाचे फिचर हे व्हाईस पोस्टचे होय. याच्या अंतर्गत आता कुणीही युजर २० सेकंदापर्यंतचा आडिओ आपल्या टाईमलाईनवर पोस्टच्या स्वरूपात अपडेट करू शकणार आहे. याला अतिशय आकर्षक असे कस्टमाईज्ड बॅकग्राऊंड देण्याची सुविधादेखील प्रदान करण्यात आली आहे. पहिल्यांदा हे फिचर ‘फेसबुक लाईट’ या अ‍ॅपच्या युजर्सला मिळाले असून येत्या काही दिवसांमध्ये अँड्रॉइड व आयओएस प्रणालीच्या युजर्सला याचा वापर करता येणार आहे. भारताच्या बर्‍याच भागांमध्ये नेटवर्कचा व अर्थातच इंटरनेटच्या वेगाचा प्रॉब्लेम असतो. यामुळे इंटरनेटचा वेग हा थोडा संथ असला तरी ऑडिओ क्लीप अपलोड करता येणार असल्याचे फेसबुकने स्पष्ट केले आहे. फेसबुकवरील स्टोरीज आणि पोस्टच्या स्वरूपात ही क्लिप वापरता येणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ‘स्टोरीज’ या फिचरप्रमाणे ही व्हाईस पोस्ट २४ तासांनी गायब होणार आहे.

याशिवाय, फेसबुकने आपल्या युजर्ससाठी ‘सेव्ह फोटोज अँड व्हिडीओज फॉर लेटर’ हे नवीन फिचर सादर केले आहे. याच्या अंतर्गत फेसबुकच्या कॅमेर्‍यातून घेतलेल्या प्रतिमा व व्हिडीओज हे स्मार्टफोनमध्ये सेव्ह होण्याऐवजी फेसबुकच्या सर्व्हरवर सेव्ह होणार आहेत. या सेव्ह केलेल्या प्रतिमा व व्हिडीओजला नंतर पाहता येणार आहे. सध्या हे फिचर अँड्रॉइडसाठी देण्यात आले असून लवकरच आयओएस प्रणालीसाठी प्रदान करण्यात येणार आहे. यासोबत फेसबुकने ‘स्टोरीज आर्काईव्ह’ हे तिसरे फिचरदेखील दिले आहे. नावातच नमूद असल्यानुसार याच्या मदतीने कुणीही युजर आपल्या विविध स्टोरीज (ज्या २४ तासानंतर गायब होतात) सेव्ह करून नंतर पाहू शकणार आहे. यामुळे आर्काईव्हमधून डिलीट केल्याशिवाय ती स्टोरी युजरला पाहता येणार आहे. याच्याच अंतर्गत आगामी काही दिवसांमध्ये स्टोअरीजमध्ये ती आर्काइव्ह करायची का? असा पर्याय विचारण्यात येणार आहे. यावर ‘ओके’ केल्यावर संबंधीत स्टोरी आर्काईव्हमध्ये जमा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here