फेसबुकवर येणार डाऊनवोट बटन

0

फेसबुकवर लवकरच डाऊनवोट बटन येणार असून याच्या मदतीने कुणीही युजर नकारात्मक प्रतिक्रियांना फ्लॅग करू शकणार आहे.

फेसबुकवर डिसलाईकचे बटन येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. फेसबुकने मध्यंतरी रिअ‍ॅक्शन्स या फिचरच्या माध्यमातून आपल्या युजर्ससाठी लाईक या सुविधेचा विस्तार सादर केला आहे. यात इमोजींच्या मदतीने विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देता येतात. यात अद्यापही डिसलाईकचा पर्याय दिलेला नाही. या पार्श्‍वभूमिवर, फेसबुकवर लवकरच डाऊनवोट ही नवीन सुविधा येण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. कारण काही युजर्सला याची चुणूक दिसून आली आहे. डाऊनवोट म्हणजे डिसलाईक नसल्याची बाब आपण लक्षात घेण्याची गरज आहे. तर एखाद्या प्रतिक्रियेला असंमती दर्शविण्यासाठी डाऊनवोट उपयोगात येणार आहे. म्हणजे एखादी कॉमेंट ही असभ्य वा संकेताला धरून नसल्यास कुणीही याला डाऊनवोट करू शकणार आहे. यातून संबंधीत कॉमेंट ही फ्लॅग करता येणार आहे. अर्थात याबाबत फेसबुकला ती कॉमेंट हटविण्याचा निर्णय घेणे सोपे होणार आहे. काही युजर्सच्या माध्यमातून याची चाचणी घेण्यात येत असून लवकरच हे फिचर सर्व युजर्सला वापरण्यासाठी मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here