फेसबुकवर भन्नाट लीप सिंकची सुविधा

0

फेसबुकने आपल्या युजर्ससाठी लीप सिंक हे अतिशय भन्नाट फिचर सादर केले असून लाईव्ह व्हिडीओजच्या माध्यमातून याचा वापर करता येणार आहे.

आपल्या युजर्सला नवनवीन सुविधा देण्याला फेसबुकने प्राधान्य दिले आहे. या अनुषंगाने आता लीप सिंक हे अतिशय अभिनव फिचर देण्यात आले आहे. एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. लाईव्ह व्हिडीओमध्ये हे फिचर वापरता येणार आहे. नावातच नमूद असल्यानुसार याच्या अंतर्गत कुणीही युजर गाजलेल्या गाण्यांच्या शब्दांनुसार आपले ओठ हलवणार आहे. एका अर्थाने हे फिचर कराओकेप्रमाणेच असले तरी याला व्हिडीओच्या स्वरूपात वापरता येणार आहे. याच्यासाठी फेसबुकने जगभरातील विख्यात संगीत कंपन्यांशी करार केला आहे. वर नमूद केल्यानुसार लीप सिंक हे फिचर रिअल टाईम या स्वरूपातील आहे. या प्रकारचा लाईव्ह व्हिडीओ सुरू असतांना त्या युजरचे मित्र यावर लाईक/शेअर/कॉमेंट करू शकतात. तसेच या मूळ गाण्याच्या कलावंताला फेसबुकवर फॉलो करण्याची सुविधादेखील यामध्ये देण्यात आली आहे. तसेच आगामी काळात या प्रकारातील व्हिडीओजला कुणीही युजर आपल्या स्टोरीजमध्ये अपलोड करू शकणार असल्याचे सूतोवाचदेखील फेसबुकने केले आहे.

सध्या मोजक्या युजर्सला हे फिचर प्रयोगात्मक अवस्थेत देण्यात आले असले तरी लवकरच याचा विस्तार करण्यात येणार असल्याचे संकेत फेसबुकने दिले आहेत. यात इंग्रजीसह अन्य भाषांमधील गाण्यांचाही समावेश करण्यात येणार आहे. या फिचरच्या माध्यमातून फेसबुकने म्युझिकल.ली या संकेतस्थळाला थेट तगडे आव्हान उभे केल्याचे मानले जात आहे.

पहा : फेसबुकचे लीप सिंग फिचरची कार्यप्रणाली दर्शविणारा व्हिडीओ.

Lip Sync Live

Facebook ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ 5 ಜೂನ್ 2018

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here