फेसबुकवर दिसतील स्थानिक बातम्या

0

फेसबुकने आपल्या युजर्सच्या न्यूज फिडमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात स्थानिक बातम्या दाखविण्याच्या आपल्या प्रयोगाची व्याप्ती वाढवली असून आता हे फिचर जगभरात प्रदान करण्यात आले आहे.

फेसबुकने काही महिन्यांपूर्वीच आपली न्यूज फिड बदलण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. यात युजरला त्याच्या मित्रांच्या पोस्ट जास्त प्रमाणात दिसणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. याच्या जोडीला युजरला न्यूज फिडमध्ये जास्त प्रमाणात लोकल न्यूज दिसणार असल्याचेही नमूद करण्यात आले होते. फेसबुकवर मोठ्या प्रमाणात फेक न्यूजचे शेअरिंग होत असते. याला आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी कृत्रीम बुध्दीमत्ता म्हणजेच आर्टीफिशियल इंटिलेजियन्सपासून ते मॉडरेटरपर्यंत अनेक उपाय करण्यात आले आहेत. यासाठी फॅक्ट चेकर्सही देण्यात आले आहेत. मात्र असे असूनही याला पूर्णपणे आळा घालण्यात अपयश आले आहे. यातच अलीकडेच मार्क झुकरबर्ग यांनी एका पोस्टच्या माध्यमातून फेसबुकची न्यूज फिड बदलण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. फेसबुकच्या अमेरिकेतील युजर्सच्या माध्यमातून या फिचरची चाचणी घेण्यात येत असल्याचे वृत्त रीकोड या टेक पोर्टलने दिले होते. आता फेसबुकने यावर शिक्कामोर्तब केले आहे.

फेसबुकने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून आपण युजर्सला प्राधान्याने त्याच्या मित्रांच्या पोस्ट दाखवणार असून याच्या खालोखाल अन्य प्रमोटेड पोस्ट वा बातम्यांच्या ऐवजी स्थानिक वृत्त जास्त प्रमाणात दाखवणार असल्याचे जाहीर केले आहे. यात युजरला त्याच्या शहराशी संबंधीत वृत्त त्याच्या टाईमलाईनमध्ये दिसतील. जगातील प्रत्येक देश आणि भाषांसाठी हे फिचर लागू करण्यात आल्याची माहितीदेखील यात देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here