फेसबुकवर थ्रीडी फोटो शेअर करण्याची सुविधा

0

फेसबुकवर आता कुणीही युजर थ्रीडी फोटो अपलोड आणि शेअर करू शकणार असून याच्या जोडीला व्हिआर सपोर्टदेखील प्रदान करण्यात आला आहे.

फेसबुकच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या एफ८ या कॉन्फरन्समध्ये थ्रीडी फोटो या फिचरबाबत माहिती देण्यात आली होती. तेव्हापासूनच याबाबत औत्सुक्याचे वातावरण निर्मित झाले होते. या अनुषंगाने आता फेसबुकने आपल्या सर्व युजर्ससाठी थ्रीडी (त्रिमीतीय) प्रतिमा अपलोड करून शेअर करण्याची सुविधा देण्याचे जाहीर केले आहे. याबाबत एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. आपण सध्या वापरत आणि पाहत असणार्‍या प्रतिमा हा टुडी म्हणजेच द्विमीतीय या प्रकारातील असतात. अर्थात यामध्ये लांबी आणि रूंदी असे दोनच आयाम असतात. तथापि, थ्रीडी या प्रकारात खोली (डेप्थ) हा तिसरा आयाम जुडलेला असतो. यामुळे या प्रकारातील फोटोग्राफ हा लांबी आणि रूंदीसोबत डेप्थदेखील दर्शविणारा असतो. यामुळे या चित्रामध्ये सजीवपणा जाणवतो. सर्वसामान्य प्रतिमांपेक्षा या प्रकारातील इमेजेस या अधिक आकर्षक असतात. आता याच प्रकारातील थ्रीडी प्रतिमा या फेसबुकवर शेअर करता येणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये जगभरातील युजर्सला हे फिचर टप्प्याटप्प्याने वापरता येणार असल्याचे फेसबुकने जाहीर केले आहे. अर्थात कुणीही युजरल या प्रकारातील फोटो अपलोड करून याला आपल्या टाईमलाईनवर शेअर करू शकतो. तर अन्य युजर्सला त्यांच्या न्यूजफिडमध्ये या प्रकारातील फोटो पाहता येणार आहे. यासोबत फेसबुकने व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी म्हणजेच आभासी सत्यतेचा आयामदेखील जोडला आहे. याला व्हिआर सपोर्ट देण्यात आला आहे. फेसबुकच्या ऑक्युलस गो या ब्राऊजर आणि ऑक्युलस रिफ्टवरील फायरफॉक्स ब्राऊजरवरही या प्रतिमा पाहता येणार आहे.

फेसबुकने आपल्या युजर्ससाठी थ्रीडी प्रतिमा कशा अपलोड करावा याची माहितीदेखील दिली आहे. यासाठी ड्युअल कॅमेरा सेटअप असणार्‍या कॅमेर्‍याची गरज आहे. या प्रकारच्या स्मार्टफोनमधून पोर्टे्रट मोडमध्ये फोटो घेतल्यानंतर याला थ्रीडी फोटो म्हणून अपलोड करता येणार आहे. हा फोटो काही प्रमाणात हलणारदेखील असून यामुळे तो अगदी जीवंत असल्यागत भासणार आहे. फेसबुकवर आधीच ३६० अंशातील प्रतिमा अपलोड व शेअर करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यातच आता थ्रीडी प्रतिमांची सुविधा देण्यात आली आहे. या माध्यमातून फेसबुक एक पाऊल पुढे सरकल्याचे मानले जात आहे.

3D Photos Now Rolling out on Facebook and in VR

Today we're starting to roll out 3D photos in both News Feed and VR. 3D photos bring scenes to life with depth and movement. Simply take a photo in Portrait mode using your compatible dual-lens smartphone, then share as a 3D photo on Facebook where you can scroll, pan and tilt to see the photo in realistic 3D.Everyone will be able to see 3D photos in News Feed and VR today, and the ability to create and post 3D photos starts rolling out today to some users, and will be available to everyone in the coming weeks. Learn more here: http://bit.ly/2Pu0Bsr

Facebook 360 ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 11, 2018

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here