फेसबुकवर टाईम मॉनिटरींगसाठी स्वतंत्र टुल

0

फेसबुकच्या युजर्सला लवकरच टाईम मॉनिटरींग करणारे टुल देण्यात येणार असून याची काही युजर्सच्या माध्यमातून चाचणी घेण्यात येत आहे.

टेकक्रंच या टेक पोर्टलने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. यानुसार आता फेसबुकच्या प्रत्येक युजरला लवकरच आपण या सोशल नेटवर्कवर नेमका किती वेळ व्यतीत करतो? याची अचूक माहिती मिळणार आहे. युवर टाईम ऑन फेसबुक या नावाने ही सुविधा सादर करण्यात येणार आहे. या माध्यमातून युजर आपल्या दैनंदिन वापराबाबत अचूक माहिती मिळवू शकतो. अर्थात तो दररोज किती टाईम फेसबुकवर व्यतीत करतो यावर लक्ष ठेवणे सुलभ होणार आहे. या टुलमध्ये तो आपल्या दैनंदिन वापराचा विशिष्ट टाईम सेट करू शकतो. या मर्यादेच्या बाहेर गेल्यास त्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून अलर्ट मिळण्याची सुविधादेखील देण्यात येणार आहे.

अलीकडच्या काळात सोशल मीडिया हे टाईम पास करण्याचे साधन असल्याची टीका होत आहे. या पार्श्‍वभूमिवर, प्रत्येक युजरला त्याच्यासाठी खूप मूल्यवान असणार्‍या टाईम मॅनेंजमेंटसाठी हे टुल अतिशय उपयुक्त ठरणार आहे. याआधी अ‍ॅपल आणि गुगल कंपन्यांनी आपल्या काही उपकरणांमध्ये टाईम मेजरमेंटची सुविधा दिलेली आहे. फेसबुकदेखील याच्याच पावलावर पाऊल टाकत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. दरम्यान, आपण या प्रकारचे टुल विकसित केले असून याची काही युजर्सच्या माध्यमातून चाचणी घेत असल्याच्या माहितीला फेसबुकच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here