फेसबुकवर ऑडिओ क्लिप अपडेटची सुविधा

0

फेसबुकने आता आपल्या युर्जससाठी ऑडिओ क्लिप अपलोड करण्याची सुविधा दिली असून यामुळे यावर आता पॉडकास्टींग करता येणार आहे.

फेसबुकवर लवकरच ऑडिओच्या स्वरूपात स्टेटस अपडेट करण्याची सुविधा येणार असल्याचे संकेत कधीपासूनच मिळाले होते. याची निवडक युजर्सच्या माध्यमातून चाचणीसुध्दा सुरू होती. आता ही सुविधा जगभरातील युजर्सला क्रमाक्रमाने मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतातील काही युजर्सला ही सुविधा मिळाली असून या अनुषंगाने टेकक्रंच या टेक पोर्टलने याबाबत वृत्त दिले आहे. यानुसार आता युजर्सला ‘अ‍ॅड व्हाईस क्लिप’ हे नवीन फिचर देण्यात आले आहे. याच्या अंतर्गत युजर्सला त्यांच्या स्टेटस अपडेट करण्याच्या जागेत ऑडिओ क्लिप हा नवीन पर्याय दिसू लागला आहे. यावर क्लिक करून कुणीही स्मार्टफोनमधील मायक्रोफानच्या मदतीने ध्वनीच्या स्वरूपातील स्टेटस अपडेट करू शकतो.

मुळातच आता जगभरात ध्वनीवर आधारित विविध टेक फिचर्स लोकप्रिय होत आहेत. बहुतांश स्मार्टफोन्समध्ये डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट दिलेला असून याचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच विविध स्मार्ट उपकरणांमध्येही व्हाईस कमांडची सुविधा दिलेली आहे. यामुळे आता फेसबुक युजर्सलाही ध्वनीच्या स्वरूपात स्टेटस अपडेट करता येणार आहे. सध्या काही युजर्सला ही सुविधा देण्यात आली असून इतरांना क्रमाक्रमाने याला देण्यात येणार असल्याचे टेकक्रंच्या वृत्तात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here