फेसबुकवर एक्सप्लोअर फिड

  0

  फेसबुकने गेल्या काही दिवसांपासून प्रयोगात्मक स्थितीत असणारी पर्यायी न्यूज फिड एक्सप्लोअर या नावाने लाँच केली असून सर्व युजर्सला ती दिसू लागली आहे.

  गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुक दुसर्‍या न्यूज फिडवर काम करत असल्याचे वृत्त होते. याची आयओएस प्रणाली वापरणार्‍या काही युजर्सच्या माध्यमातून चाचणीदेखील घेण्यात येत होती. आता सर्व युजर्सला हे फिचर प्रदान करण्यात आले आहे. या अंतर्गत त्या युजर्सच्या आवडी-निवडी, त्याने केलेले लाईक्स, त्याच्या मित्रांच्या आवडी-निवडी आणि एकंदरीतच त्याचा पिंड लक्षात घेता त्याच्या टाईमलाईनवर नसणारे कंटेंट सादर करण्यात येणार आहे. यात विविध पोस्ट, लेख, व्हिडीओ, प्रतिमा, आदींचा समावेश असेल. रॉकेटच्या चिन्हाने ही नवीन न्यूजफिड कार्यान्वित झाली आहे. फेसबुकच्या मोअर या मेन्यूवर क्लिक केल्यानंतर एक्सप्लोअर ही टॅब दिसत असून यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दुसरी न्यूज फिड दिसून येत आहे.

  फेसबुकने याआधी इंटरेस्ट लिस्ट या फिचर्सच्या माध्यमातून युजर्सला त्यांना आवडणार्‍या विषयांवरील पोस्ट वर्गीकृत करण्याची सुविधा दिली होती. मात्र युजर्सचा याला फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे तिला बंद करण्यात आले. यानंतर फेसबुकने आपल्या स्मार्टफोन अ‍ॅपवर सोशल अ‍ॅप रूम्स या नावाने याच प्रकारचे फिचर दिले होते. मात्र यालाही युजर्सचा प्रतिसाद लाभला नाही. या पार्श्‍वभूमिवर आता एक्सप्लोअर फीडच्या माध्यमातून नवीन पर्याय सादर करण्यात आला असून याला कितपत प्रतिसाद लाभतो ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here