फेसबुकवरील सर्व आठवणींना एकाच ठिकाणी पाहता येणार

0

फेसबुकने ‘मेमरीज’ हे नवीन फिचर दिले असून याच्या माध्यमातून एकाच पेजवर युजरला त्याने शेअर केलेले सर्व कंटेंट एकाच ठिकाणी पाहता येणार आहे.

सध्या कुणीही युजर आपल्या टाईमलाईनवर त्याने शेअर केलेल्या पोस्ट कालानुक्रमे पाहू शकतो. मात्र आता याला अधिक उत्तम पध्दतीत पाहण्यासाठी स्वतंत्र पेज देण्यात येणार आहे. यालाच ‘मेमरीज’ असे नाव देण्यात आले असल्याची माहिती फेसबुकने एका पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. यानुसार ‘मेमरीज’ हे फिचर फेसबुकने आधीच प्रदान केलेल्या ‘ऑन धीस डे’ या फिचरचा विस्तार असल्याचे दिसून येत आहे. हे फिचर फेसबुकचे तब्बल ९ कोटी युजर्स वापरत असतात. या माध्यमातून युजर आपापल्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देत असतात. याचा संबंधीत युजर्सच्या मनावर अनुकुल परिणाम होत असल्याचे फेसबुकच्या सर्व्हेक्षणातून आढळून आले आहे. यामुळे याला अधिक उत्तमरित्या एका पेजच्या स्वरूपात सादर करण्यात येत आहे. याच्या अंतर्गत युजर एकाच ठिकाणी खालील बाबींना पाहू शकतो.

१) ऑन धीस डे :- आधीप्रमाणेच युजर आपण आधी शेअर केलेल्या पोस्ट आणि लाईफ ÷इव्हेंटची माहिती या पेजवर एकाच ठिकाणी पाहू शकणार आहे.

२) फ्रेंड मेड ऑन धीस डे : – यामध्ये युजरने त्या दिवशी फेसबुकवर कुणाशी मैत्री केली याची माहिती मिळू शकते. तसेच या मित्रांच्या मैत्रीच्या सेलीब्रेशनसाठी आधी शेअर केलेले व्हिडीओदेखील येथेच पाहता येणार आहे.

३) रिकॅप्स ऑफ मेमरीज :- यात युजरच्या विविध महिन्यांसाठी वा मोसमानुसारच्या शुभेच्छांना संदेश आणि शॉर्ट व्हिडीओसोबत देण्यात येणार आहे.

४) मेमरीज यू हॅव मिस्ड:- अनेकदा युजर घाई गडबडीत ‘ऑन धीस डे’ हा विभाग पाहण्याचे विसरून जातो. यासाठी हा स्वतंत्र विभाग देण्यात येणार असून यात आधीच्या सर्व मेमरीजला प्रदान करण्यात येणार आहे.

मेमरीज हे फिचर जगभरातील युजर्सला क्रमाक्रमाने प्रदान करण्यात येणार आहे. संगणकावरून फेसबुक वापरत असतांना डाव्या बाजूला खालील बाजूस हे फिचर देण्यात आले असेल. तर मोबाईल अ‍ॅपवर ‘मोअर’ या विभागात हे फिचर पाहता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here