फेसबुकमध्ये इनबिल्ट जीआयएफ मेकर

0

फेसबुकमध्ये लवकरच जीआयएफ अ‍ॅनिमेशन तयार करणारे इनबिल्ट टुल देण्यात येणार असून काही युजर्सच्या माध्यमातून याची चाचणी करण्यात येत आहे.

आययोएस प्रणालीच्या स्मार्टफोनवरून (आयफोन) फेसबुकचे अ‍ॅप वापरणार्‍यांना काही युजर्सला आता जीआयएफ अ‍ॅनिमेशन तयार करण्याचे टुल दिसू लागले आहे. या संदर्भात द नेक्स्ट वेब या न्यूज पोर्टलने सर्वप्रथम वृत्त दिले आहे. यात काही युजर्सला फेसबुक कॅमेर्‍या अ‍ॅपच्या वरील भागात जीआयएफ हा पर्याय दिसू लागल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यावर टॅप केल्यानंतर कुणीही युजर आपल्या स्मार्टफोनच्या कॅमेरा रोलमध्ये असणार्‍या व्हिडीओला जीआयएफ अ‍ॅनिमेशनमध्ये परिवर्तीत करून आपल्या गॅलरीत सेव्ह करू शकतो. यानंतर हे अ‍ॅनिमेशन फेसबुकचे स्टेटस अथवा प्रतिक्रियांमध्ये वापरता येते.

जीआयएफ हा प्रकार अलीकडच्या काळात खूप लोकप्रिय झाला आहे. काही दिवसांपुर्वीच फेसबुकने आपल्या युजर्सला कॉमेंटच्या स्वरूपात जीआयएफचा उपयोग करण्याचे फिचर प्रदान केले आहे. याला चांगली लोकप्रियता लाभली आहे. या पार्श्‍वभूमिवर इनबिल्ट जीआयएफ मेकर सादर करण्यात आल्याची बाब लक्षणीय आहे. लवकरच ही सुविधा अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी सादर करण्यात येईल अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here