फेसबुकच्या लिंकवर असेल प्रकाशकाची माहिती

0

फेसबुकने फेक न्यूजला आळा घालण्यासाठी अजून एका नवीन फिचरचा वापर सुरू केला असून यात या साईटवर शेअर करण्यात येणार्‍या प्रत्येक लिंकवर त्या प्रकाशकाबद्दलची माहिती देण्यात येणार आहे.

फेक न्यूज हा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. याला आळा घालण्यासाठी टेक कंपन्या निकराचे प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने फेसबुकने एक नाविन्यपूर्ण फिचर सादर केले आहे. याच्या अंतर्गत या सोशल नेटवर्कींग साईटवर सादर करण्यात येणार्‍या लिंकसोबत संबंधीत पब्लीशरची माहितीदेखील देण्यात येणार आहे. यासाठी “i” (आय) या अक्षरावर क्लिक करावे लागेल. यावर क्लिक केल्यानंतर संबंधीत पब्लीशरबाबतची माहिती समोर येईल. यात त्या प्रकाशकाची वेबसाईट, फेसबुक पेज, त्यावरील शेअरिंगची माहिती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या प्रकाशकाबाबत विकीपेडियावरील माहिती समावेश असेल. विकीपेडियावर माहिती असणारा प्रकाशक हा विश्‍वासार्ह असल्यामुळे याचा या माहितीत समावेश करण्यात आल्याचे मानले जात आहे. फेसबुकने एका ब्लॉग पोस्टद्वारे आपल्या या नवीन फिचरची माहिती दिली आहे.

फेसबुकचे हे नवीन फिचर अतिशय महत्वपूर्ण मानले जात आहे. याच्या माध्यमातून प्रत्येक प्रकाशकाबाबतची माहिती युजर्सला मिळू शकेल. अर्थात यामुळे संबंधीत पब्लीशर हा कितपत विश्‍वासार्ह आहे? याची जाणीवदेखील युजर्सला होणार आहे. सध्या काही युजर्सला हे फिचर दिसू लागले असून येत्या काही दिवसात जगभरात याला लागू करण्यात येणार असल्याचे फेसबुकतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here