फेसबुकचे व्हीआर लाईव्ह व्हिडीओ शेअरिंग

0

फेसबुकने आपल्या स्पेसेस या टुलच्या माध्यमातून व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी म्हणजेच व्हिआर या प्रकारातील लाईव्ह व्हिडीओ शेअरिंगची सुविधा प्रदान केली आहे.

फेसबुक व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी अर्थात आभासी सत्यता या प्रकारावर गांभिर्याने काम करत आहे. कंपनीने आधीच ऑक्युलस रिफ्टच्या माध्यमातून एक अतिशय दर्जेदार व्हीआर हेडसेट बाजारपेठेत सादर केला आहे. तर काही महिन्यांपुर्वीच फेसबुकने स्पेसेस हे व्हिआर शेअरिंगसाठी टुल सादर केले होते. यात कुणीही आभासी सत्यतेत आपल्या मित्रांसोबत प्रतिमा, जीआयएफ अ‍ॅनिमेशन, व्हिडीओ आदी शेअरिंगचे काम करू शकत होते. याला आता लाईव्ह व्हिडीओजची जोड देण्यात आली आहे. यामुळे आता कुणीही यावरून लाईव्ह व्हिडीओ आपल्या मित्रांसोबत शेअर करू शकतो. अर्थात मित्र ऑक्युलस रिफ्ट या हेडसेटचा वापर करून याला व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी म्हणजे आभासी सत्यतेत पाहू शकतात. याच्या मदतीने कुणीही अतिशय मनोरंजक पध्दतीने व्हिडीओजचा आनंद घेऊ शकेल. यासाठी सध्या बीटा अवस्थेत असणारे फेसबुक स्पेसेस हे डाऊनलोड करावे लागेल.

Live From Facebook Spaces

Posted by Facebook on Tuesday, July 11, 2017

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here