फेक अकाऊंटवर ‘आधार’चा उतारा ?

0
Facebook

फेक अकाऊंटला आळा घालण्यासाठी फेसबुक आधारवरील नावाची माहिती विचारत असून अद्याप प्रायोगिक अवस्थेत याचा वापर करण्यात येत असल्याचे फेसबुकतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

फेसबुकवर फेक बातम्यांप्रमाणे फेक अकाऊंटची समस्यादेखील खूप गंभीर बनली आहे. याला आळा घालण्यासाठी फेसबुकने अगदी कृत्रीम बुध्दीमत्ता, मशिन लर्नींगसह अनेक प्रणालींचा वापर केला असला तरी याचे पुरेपूर निर्मुलन करण्यात आलेले नाही. या पार्श्‍वभूमिवर, आता भारतातील काही युजर्सला नव्याने फेसबुक अकाऊंट उघडतांना त्यांच्या ‘आधार’ची माहिती विचारली जात आहे. अर्थात यात अन्य तपशील मागितला जात नसून युजरला फक्त त्याने ‘आधार’ प्रमाणेच नाव द्यावे असे सूचित केले जात आहे. सध्या तरी फेसबुकच्या मोबाईल साईटवरच ही बाब दिसून येत आहे. फेसबुकने याबाबत अधिकृत भाष्य केले नसले तरी ही चाचणी प्रयोगात्मक अवस्थेत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here