फुजीफिल्मचे इन्स्टॅक्स शेअर इन्स्टंट स्मार्टफोन प्रिंटर

0

फुजीफिल्म कंपनीने भारतात आपले इन्स्टॅक्स शेअर इन्स्टंट स्मार्टफोन प्रिंटर सादर केले असून याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या प्रकारात उपलब्ध करण्यात आले आहे.

सध्या स्मार्टफोनचा वापर सर्वाधीक होत असून याच्याशी संलग्न असणारे इन्स्टंट प्रिंटर्सही लोकप्रिय झाले आहेत. या अनुषंगाने फुजीफिल्म कंपनीने इन्स्टॅक्स शेअर स्मार्टफोन प्रिंटर एसपी-२ हे स्मार्टफोन प्रिंटर बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. यांचे मूल्य १३,४९९ रूपये आहे. या प्रिंटरमधून ४२ बाय ४६ मिलीमिटर आकारनाच्या प्रिंट घेता येणार आहेत. वाय-फायच्या मदतीने हे प्रिंटर स्मार्टफोनला कनेक्ट करता येते. या प्रिंटरची क्षमता १०० फोटोग्राफ्सची आहे. स्मार्टफोनवरून प्रिंटची कमांड दिल्यानंतर अवघ्या १० सेकंदात याची प्रिंट मिळत असल्याचा फुजीफिल्म कंपनीचा दावा आहे.

या स्मार्टफोन प्रिंटरला एका अ‍ॅपच्या माध्यमातून कनेक्ट करता येणार आहे. याच्या मदतीने कुणीही एखादी प्रिंट देण्याआधी यावर विविध फिल्टर देऊ शकतो. हे मॉडेल गोल्ड आणि सिल्व्हर या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here