फिओचे एक्स ७ मार्क २ स्मार्ट म्युझिक प्लेअर

0

फिओ या कंपनीने हाय-रेझोल्युशनच्या ध्वनीची सुविधा असणार्‍या एक्स ७ मार्क ७ या स्मार्ट म्युझिक प्लेअरला बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

फिओ (fiio) ही कंपनी आपल्या म्युझिक प्लेअर्ससाठी ख्यात आहे. यात आता एक्स ७ मार्क २ या स्मार्ट म्युझिक प्लेअरची भर पडणार आहे. याची खासियत म्हणजे यात हाय रेझोल्युशन साऊंडचे फिचर आहे. आजवर आपण फक्त डिस्प्लेबाबतच हाय रेझोल्युशन हा श÷ब्द ऐकला असेल. मात्र ध्वनीदेखील हाय-रेझोल्युशन क्षमतेचा असतो. आणि अलीकडच्या काळात याच प्रकारातील ध्वनीची सुविधा असणारे प्लेअर्स बाजारात उपलब्ध होत असून प्रस्तुत मॉडेलदेखील याच प्रकारातील आहे. काही महिन्यांपूर्वी चीनमध्ये हे म्युझिक प्लेअर लाँच करण्यात आले असून आता भारतीय ग्राहकांना ते ५४,९९० रूपये मूल्यात सादर करण्यात आले आहे. याच कंपनीने आधी लाँच केलेल्या एक्स ७ या मॉडेलमध्ये काही बदल करून याला बाजारपेठेत उतारण्यात आले आहे.

एक्स ७ मार्क ७ हे म्युझिक प्लेअर अँड्रॉइडच्या लॉलीपॉप प्रणालीवर चालणारे आहे. याची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी आहे. याशिवाय या प्लेअरला दोन मायक्रो-एसडी कार्ड देण्यात आले असून याच्या मदतीने हे स्टोअरेज २५६ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. अर्थात यात हजारो तासांचे संगीत स्टोअर करता येईल. यात ४८० बाय ८०० पिक्सल्स क्षमतेचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला असून याच्या माध्यमातून विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करता येणार आहे. यात वाय-फाय आणि ब्ल्यु-टुथ कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. याच्या मदतीने स्मार्टफोनसह अन्य उपकरणांमधील संगीत या म्युझिक प्लेअरवर ऐकता येईल. याला हेडफोन जॅकदेखील देण्यात आले आहे. तर फास्ट चार्जींगच्या सपोर्टसह यात ३,८०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यात एक खास फिचर देण्यात आले असून याच्या मदतीने कोणतेही गाणे ऐकत असतांना त्या गीताचे शब्द डिस्प्लेवर दिसतील. हे म्युझिक प्लेअर फिओ कंपनीच्या संकेतस्थळावरून ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here