फास्टॅग प्रणाली वाहतुकीसाठी ठरणार उपकारक

0
(प्रतिकात्मक प्रतिमा- पेटीएम ब्लॉगच्या सौजन्याने.)

फास्टॅग या प्रणालीच्या माध्यमातून प्रत्येक वाहनाला आधारप्रमाणे युनिक क्रमांक मिळणार असून टोल अदा करण्याची प्रक्रियादेखील सुलभ व सुटसुटीत होणार आहे.

केंद्रीय दळणवळण मंत्रालय आणि नॅशनल हायवे ऑथेरिटी ऑफ इंडिया म्हणजेच न्हाईने काही दिवसांपूर्वीच फास्टॅग ही प्रणाली सुरू केली आहे. यासाठी दोन स्मार्टफोन अ‍ॅप्लीकेशन्सदेखील लाँच करण्यात आले आहेत. फास्टॅग हे रेडिओ फ्रिक्वन्सी आयडेंटीफिकेशन या प्रणालीवर आधारित स्टीकर टॅग आहेत. फास्टॅग स्टीकर हे वाहनाच्या विंडशिल्डवर लावलेले असेल. अशा प्रकारच्या वाहनांसाठी देशातील प्रत्येक टोल नाक्यावर स्वतंत्र लेन राखीव ठेवण्यात येणार आहे. यात संबंधीत आरएफआयडी टॅग रीड करणारी यंत्रणा लावण्यात आलेली असेल. यामुळे वाहनचालकाला त्या टोल नाक्यावर थांबून टोल अदा करण्याची आवश्यकता उरणार नाही. तर आरएफआयडी टॅगच्या माध्यमातून त्या युजरच्या अकाऊंटमधून टोलचे पैसे संबंधीत नाक्याच्या खात्यात जमा होतील. यामुळे प्रदूषण, वाहतुकीची कोंडी या सर्व बाबींना आळा बसणार आहे. सध्या आयसीआयसीआर, अ‍ॅक्सीस बँक आणि पेटीएमने या टॅगला कार्यान्वित करण्याची सुविधा दिलेली आहे. लवकरच याचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here