फायरफॉक्सचे एक्सटेन्शन वापरा आणि निर्धास्त व्हा !

1

फेसबुकवरील डाटा लीक प्रकरणी गोंधळ उडाला असतांना मोझिलाने युजर्सच्या सुरक्षेसाठी आपल्या फायरफॉक्स ब्राऊजरवर फेसबुक कंटेनर या नावाने नवीन एक्सटेन्शन सादर केले आहे.

केंब्रिज अ‍ॅनालिटीका प्रकरणातून फेसबुकवरील गोपनीय माहिती ही कुणीही थर्ड पार्टी स्मार्टफोन अ‍ॅप्लीकेशन्स सहजपणे मिळवू शकत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर फेसबुक मॅसेंजरच्या माध्यमातून युजरचा कॉल लॉगही ट्रॅक करण्यात येत असल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्‍वभूमिवर, युजरला सुरक्षितपणे सोशल साईटचा वापर करण्यात यावा यासाठी विविध टुल्स सादर करण्यात येत आहेत. यात आता मोझिला फायरफॉक्स ब्राऊजरच्या फेसबुक कंटेनर या एक्सटेन्शनची भर पडली आहे. कुणाही युजरने आपल्या ब्राऊजरमध्ये हे एक्सटेन्शन इन्स्टाल करून फेसबुकचा वापर केला असता त्या युजरची कोणत्याही प्रकारची गोपनीय माहिती फेसबुक तसेच अन्य कोणतेही थर्ड पार्टी अ‍ॅप चोरू शकत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

युजरच्या सुरक्षेसाठी आणि त्याला त्रास होऊ नये म्हणून अलीकडच्या काळात विविध ब्राऊजर्सने अनेक पातळ्यांवरून उपायोजना केल्या आहेत. गुगलच्या क्रोम ब्राऊजरवर अलीकडेच त्रासदायक ऑटो-प्ले या प्रकारातील व्हिडीओजला अटकाव करण्याची सुविधा इनबिल्ट अवस्थेत देण्यात आली आहे. अ‍ॅपलच्या सफारी या ब्राऊजरमध्येही युजरच्या गोपनीय माहितीला ट्रॅक न करण्यासाठी टुल दिले आहे. यातच आता फेसबुक कंटेनर या एक्सटेन्शनच्या माध्यमातून मोझिला फायरफॉक्स ब्राऊजरनेही युजरच्या सुरक्षेला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here