फाईल्स गो अ‍ॅपचे अपडेट : बदललेल्या नावासह नवीन फिचर्सचा समावेश

0

गुगलने आपल्या फाईल्स गो अ‍ॅपचे अपडेट सादर करत याचे नाव बदलण्यात आलेले असून यात काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

गुगलने गत वर्षाच्या अखेरीस फाईल्स गो अ‍ॅप सादर केले होते. याला युजर्सचा बर्यापैकी प्रतिसाद लाभला आहे. याचे अपडेट आता सादर करण्यात आले आहे. यातील सर्वात लक्षणीय बदल म्हणजे याचे नाव बदलण्यात आलेले आहे. याला आता फक्त मफाईल्सफ या नावाने आता ओळखले जाणार आहे. अर्थात, मफाईल्स गोफ ऐवजी आता याचे नाव मफाईल्सफ हे असणार आहे. यातील दुसरी लक्षणीय बाब म्हणजे यात आता मटेरियला डिझाईन प्रदान करण्यात आलेले आहे. याच्या अंतर्गत अ‍ॅपला अधिक आकर्षक लूक देण्यात आला आहे. यात फाँटदेखील बदलण्यात आलेले आहेत.

फाईल्स अ‍ॅपमध्ये इंटरनेट नसतांनाही ब्ल्युटुथ तंत्रज्ञानाच्या मदतीने अतिशय वेगाने विविध प्रकारच्या फाईल्स शेअर करता येतात. या अ‍ॅपच्या मदतीने उपकरणातील अनावश्यक फाईल्सदेखील क्लिन करता येतात. याच्या जोडीला एका टॅबवर क्लिक करून स्मार्टफोनमधील कोणतीही फाईल अन्य स्मार्टफोन युजरकडे पाठविण्याची सुविधादेखील यात देण्यात आलेली आहे. या अ‍ॅपचा इंटरफेस हा अगदी सुलभ असा आहे. याच्या होमस्क्रीनवर स्टोअरेज आणि फाईल्स हे दोन भाग आहेत. यातील स्टोअरेज या भागात संबंधीत स्मार्टफोन अथवा टॅबलेटवर नेमक्या किती मेमरीचा वापर होत आहे? याची माहिती मिळू शकते. यात युजर अनावश्यक फाईल्सला डीलीट करू शकतो. तर फाईल्स या भागात त्या उपकरणातील विविध फाईल्स उदा. डाऊनलोड केलेल्या फाईल्स, प्रतिमा, व्हिडीओ, डॉक्युमेंट, ऑडिओ आदींना दर्शविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here