प्रथम उबंटू स्मार्टफोन

0

उबंटू या ऑपरेटींग प्रणालीवर चालणारा बीक्यू आयरिस ई ४.५ हा पहिला स्मार्टफोन सोमवारपासून विक्रीस उपलब्ध होत आहे.

ubantu_phone

उबंटू ही लिनक्सपासून विकसित करण्यात आलेली ऑपरेटींग प्रणाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अनेकदा उबंटू प्रणालीवर चालणारा स्मार्टफोन येणार असल्याची चर्चा होती. आता अखेर सोमवार दिनांक ९ फेब्रुवारीपासून बीक्यू आयरिस ई ४.५ हा पहिला स्मार्टफोन विक्रीस उपलब्ध होत आहे. प्रारंभी हा स्मार्टफोन युरोपमध्ये ऑनलाईन फ्लॅश सेलच्या माध्यमातून विकला जाणार आहे. यानंतर अन्य भागांमधील ग्राहकांना तो मिळण्याची शक्यता आहे. यात साडेचार इंच आकारमानाचा क्युएचडी डिस्प्ले, क्वॉडकोअर मीडियाटेक ए-७ प्रोसेसर, आणि एक जीबी रॅम देण्यात आली आहे. याचे कॅमेरे आठ आणि पाच मेगापिक्सल्स क्षमतेचे आहेत. याचे मुल्य १७० युरो (सुमारे ११९३५ रूपये) इतके आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here