पोर्शे ९११ जीटी३ सुपरकार भारतात दाखल

  0

  पोर्शे या कंपनीने भारतात आपली ९११ जीटी३ ही नवीन सुपरकार सादर करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

  भारतीय बाजारपेठेत एंट्री लेव्हलच्या कार मोठ्या प्रमाणात विकल्या जात असल्या तरी प्रिमीयम मॉडेल्सदेखील अलीकडे लोकप्रिय होऊ लागले आहेत. याची बाजारपेठेत आकारास येत आहे. यात आता पोर्शे ९११ जीटी३ ही सुपरकार दाखल झाली आहे. यात आधीच्या आवृत्तीपेक्षा अनेक नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यातील लक्षणीय बदल हा इंजिनात दिसून आला आहे. या नवीन आवृत्तीत ४.० लीटर क्षमतेचे सिक्स सिलींडर इंजिन देण्यात आले आहे. अर्थात आधीपेक्षा यात शक्तीशाली इंजिन असेल. तर यातील दुसरे विशेष फिचर म्हणजे ड्युअल गिअरबॉक्स होय. यात ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ७ स्पीड पीडीके अ‍ॅटोमॅटीक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. यातील दुसर्‍या गिअरबॉक्सच्या मदतीने ० ते १०० किलोमीटर प्रति-तास इतका वेग अवघ्या ३.४ सेकंदात गाठता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर ही सुपरकार अधिकतम ३१४ किलोमीटर प्रति-तास इतक्या वेगाने धावत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

  याशिवाय या नवीन मॉडेलमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यात एयरो-डायनॅमिक डिझाईन प्रदान करण्यात आले असून पुढील आणि मागच्या भागाचे वजन कमी करण्यात आले आहे. याचा ग्राऊंड क्लिअरन्स हा २५ मिलीमिटरने कमी करण्यात आला आहे. तथापि, यात उत्तम दर्जाचे सस्पेन्शन देण्यात आले असून ते खराब रस्ता असल्यानंतर ३० मिलीमिटरने विस्तार पावण्यास सक्षम आहेत. आतील भागाचा विचार केला असता, ही सुपरकार स्पोर्टस स्टीअरिंग व्हिलने सज्ज आहे. याशिवाय यात पोर्शे कम्युनिकेशन मॅनेजमेंटने युक्त असणारी अत्यंत दर्जेदार इन्फोटनमेंट प्रणाली देण्यात आली आहे. याला स्मार्टफोन कनेक्ट करता येणार आहे. या मॉडेलचे दिल्लीतील एक्स शोरूम-मूल्य २.३१ करोड रूपये इतके असेल.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here