पोर्ट्रोनिक्सची वाय-फाय व्हिडीओ डोअरबेल

0

पोर्ट्रोनिक्स कंपनीने वाय-फाय कनेक्टीव्हिटी असणारी व्हिडीओ डोअरबेल भारतीय ग्राहकांसाठी बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

तंत्रज्ञानाचे पुढील हॉट डेस्टीनेशन हे होम अ‍ॅटोमेशन असल्याचे आधीच अधोरेखीत झाले आहे. अर्थात आता स्मार्टफोनसह घरातील विविध उपकरणे हे स्मार्ट होऊ लागली आहेत. या अनुषंगाने पोट्रॉनिक्स कंपनीने एम डोअरबेल हे उपकरण बाजारपेठेत सादर केले आहे. यात वाय-फाय नेटवर्क कनेक्टीव्हिटी प्रदान करण्यात आली आहे. यात दरवाज्यावर कॅमेरा लावण्याची सुविधा असून युजर आपल्याकडे कुणीही आलेल्या व्यक्तीला स्मार्टफोनवर पाहू शकणार आहे. अर्थात हा कॅमेरा लाईव्ह स्ट्रीमिंग करणार असून यातील लाईव्ह चित्रीकरण हे स्मार्टफोनवर पाहता येणार आहे. हे चित्रीकरण एचडी क्षमतेचे असल्यामुळे दरवाजावर उभा असणारा व्यक्ती अगदी स्पष्टपणे पाहता येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. यामध्ये मोशन सेन्सर देण्यात आले असून याच्या मदतीने दरवाजाबाहेरील कोणतीही हालचाल युजरला समजू शकणार आहे. यासाठी कंपनीने अँड्रॉईड व आयओएस प्रणालींसाठी स्वतंत्र अ‍ॅपदेखील सादर केले आहे. यामध्ये ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे ३ ते ४ महिन्यांचा बॅकअप देणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. विशेष बाब म्हणजे ही डोअरबेल वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ असल्यामुळे कोणत्याही वातावरणात वापरता येणार आहे.

पोट्रॉनिक्सची एम व्हिडीओ डोअरबेल ही ग्राहकांना १०,९९० रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आली आहे. याला ग्राहक ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये खरेदी करू शकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here