पोर्ट्रानिक्सचे हार्मोनिक प्ले वायरलेस इयरफोन्स दाखल

0

पोर्ट्रानिक्स कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी हार्मोनिक प्ले हा वायरलेस कनेक्टीव्हिटी असणारे इयरफोन्स बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

पोर्ट्रानिक्स ही कंपनी ध्वनी तसेच अन्य उपकरणांच्या निर्मितीसाठी ख्यात आहे. याच कंपनीने आता सध्याच्या सणासुदीच्या कालखंडात हार्मोनिक प्ले हे मॉडेल ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे. या मॉडेलचे मूल्य २,९९९ रूपये असून याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. याची रचना ही अतिशय आकर्षक असून हे मॉडेल दीर्घ काळापर्यंत वापरले तरी कानाला त्रास होत नसल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यामध्ये अतिशय उच्च दर्जाच्या नॉईस कॅन्सलेशन प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. यामुळे यात बाह्य आवाजांचा अडथळा न येता संगीताचा आनंद घेता येणार आहे.

वर नमूद केल्यानुसार हार्मोनिक प्ले हे मॉडेल वायरलेस या प्रकारातील आहे. अर्थात याला ब्ल्यु-टुथच्या मदतीने स्मार्टफोन अथवा अन्य स्मार्ट उपकरणाला कनेक्ट करता येणार आहे. याची रेंज ३० मीटर अंतरापर्यंतची असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. याच्या मदतीने स्मार्टफोनवर कॉल करणे अथवा आलेला कॉल रिसीव्ह करणे शक्य आहे. महत्वाची बाब म्हणजे एका वेळी दोन उपकरणांना हे इयरफोन्स कनेक्ट करता येणार आहेत. यात अतिशय उत्तम दर्जाची बॅटरी देण्यात आलेली असून ती तब्बल १० तासांचा बॅकअप देण्यास सक्षम आहे. विशेष म्हणजे ही बॅटरी फक्त दोन तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. हे इयरफोन्स जेट ब्लॅक या रंगाच्या पर्यायात उपलब्ध करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here