पेटीएम मॉलवर किरकोळ दुकानदारांचा विक्रीचा विक्रम

0

पेटीएम कंपनीच्या मालकीच्या पेटीएम मॉलने ”मेरा कॅशबॅक सेल” च्या दरम्यान १० शहरांतील ७५हून अधिक दुकानदारांनी १ कोटींहून अधिकच्या सामानाची विक्री केल्याची घोषणा कंपीनतर्फे करण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे हे विक्रेते विविध वर्गातील असून यात बंगळुरू, दिल्ली/एनसीआर, चेन्नई, मुंबई व हैदराबाद यांसारख्या महानगरांसह जयूपर, अहमदाबाद, विशाखापट्टणमसारख्या छोट्या शहरांचादेखील समावेश आहे. पेटीएम कंपनीच्या क्यूआर कोड प्रणालीने भागीदार विक्रेत्यांना त्यांच्या ऑफलाईन स्टोरमध्ये ग्राहकांना उत्पादनांची खरेदी केल्यावर पेमेंट करण्याची सोपी पद्धत उपलब्ध करून दिल्यामुळे उत्सवी सेलदरम्यान होणारी गर्दी नियंत्रित करण्यासही मदत केली आहे. या विक्रेत्यांनी अधिकाधिक ऑर्डर नोंदविण्याकरिता आपल्या ऑफलाइन विपणन मोहिमेत पेटीम मॉलच्या क्यूआर कोडचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. याचा अर्थातच त्यांचा लाभ झाल्याचे दिसून येत आहे.

या संदर्भात पेटीएम मॉलचे मुख्य संचालन अधिकारी अमित सिन्हा यांनी सांगितले की, पेटीएम मॉलमुळे आमचे भागीदार विक्रेते क्यूआर कोड प्रणालीसह आता २४ तास ऑर्डर नोंदवून घेण्यासाठी सक्षम झाले आहेत. आगामी कालखंडात संपूर्ण भारतातील किरकोळ विक्रेत्यांना अधिक संधी उपलब्ध करून देताना त्यांना अधिक मजबूत करण्यासह त्यांच्या वाढीस हातभार लावण्याचे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here