पॅनासोनिक टफबुक सीएफ-३३ : रफ वापरण्याजोगे टु-इन-वन नोटबुक

0

पॅनासोनिक कंपनीने टफबुक सीएफ-३३ हे नोटबुक आणि लॅपटॉप या दोन्ही प्रकारांमध्ये वापरण्यायोग्य मॉडेल भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.

पॅनासोनिक टफबुक सीएफ-३३ या मॉडेलची खासियत म्हणजे नावातच नमूद असल्यानुसार हे मॉडेल अगदी रफ पध्दतीने वापरता येते. अगदी विषम वातावरणातही याचा कुणीही सुलभपणे वापर करू शकते. यासाठीच याला खास विकसित करण्यात आले आहे. हे मॉडेल वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ असेल. यातील डिस्प्ले हा १२ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी क्षमतेचा म्हणजे २१६० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचा असेल. हा डिस्प्ले ३६० अंशात फिरू शकतो. यासोबत तो विलगदेखील करणे शक्य आहे. याचमुळे ते नोटबुक आणि लॅपटॉप या दोन्ही प्रकारांमध्ये वापरणे शक्य आहे. या डिस्प्लेचा अस्पेक्ट रेशो ३:४ असून याला ड्युअल टच डिजीटायझर इफेक्ट आहे. यामुळे हा डिस्प्ले टचस्क्रीन तसेच स्टायलस पेनसह वापरणे शक्य आहे. यात इंटेलचा अद्ययावत कोअर आय-५-७३००यू व्हीप्रो हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम ८ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज २५६ जीबी असेल. या मॉडेलमध्ये एचडीएमआय, युएसबी ३.०, इथरनेट, मायक्रोएसडी-एक्ससी, युएसबी २.० पोर्ट आदी फिचर्स देण्यात आले असून सोबत उत्तम दर्जाचा किबोर्डही असेल.

पॅनासोनिक टफबुक सीएफ-३३ या मॉडेलच्या मागील बाजूस ८ मेगापिक्सल्सचा तर समोर २ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल दहा तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनर, बारकोड रीडर, स्मार्टकार्ड रीडर आणि कॉन्टॅक्टलेस स्मार्टकार्ड रीडर आदी विशेष फिचर्सदेखील देण्यात आले आहेत. तर पॅनासोनिक टफबुक सीएफ-३३ हे मॉडेल विंडोज १० प्रो या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारे असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here