पॅनासोनिकचा वायरलेस व्हिडीओ डोअरफोन दाखल

0
पॅनासोनिक वायरलेस व्हिडीओ डोअरफोन, panasonic wireless video door phone

पॅनासोनिक कंपनीने व्हीएल-एसडब्ल्यू २७४ हा वायरलेस व्हिडीओ डोअरफोन भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे.

पॅनासोनिकचा हा व्हिडीओ डोअरफोन ३३,४५० रूपये मूल्यात ग्राहकांना सादर करण्यात आला आहे. हे मॉडेल ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये खरेदी करता येणार आहे. भारतात सर्व्हायलन्स उपकरणे मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. यामध्ये व्हिडीओ डोअरफोन हा अविभाज्य घटक मानला जातो. या अनुषंगाने हे मॉडेल मोठ्या गृहनिर्माण सोसायटी तसेच बंगल्यांसाठी अतिशय परिणामकारक ठरू शकतो. नावातच नमूद असल्यानुसार हे वायरलेस या प्रकारातील मॉडेल असल्यामुळे यातील कॅमेरा आणि डिस्प्ले यात वायरचा कोणताही संबंध नसेल. अर्थात जिथे वायरलेस कनेक्टीव्हिटी नाही वा अडथळा अशांसाठी वायरची व्यवस्थाही यात करता येते. हा फोन एकंदरीत सहा विविध मॉनिटर्सशी एकदाच जोडणे शक्य आहे. याच्या मदतीने आपल्या दाराच्या बाहेर नेमका कोण व्यक्ती आलाय? याची अचूक माहिती घरातील व्यक्तींना होऊ शकते. अर्थात सुरक्षेसाठी हा व्हिडीओ डोअरफोन अतिशय उपयुक्त ठरणारा आहे. यामध्ये ५० व्हिडीओ कॉल रेकॉर्ड होऊ शकतात. याच्या कॅमेर्‍यासोबत एलईडी लाईट देण्यात आलेले आहेत. यामुळे बाहेरून येत असणार्‍या व्यक्तीचा चेहरा अगदी स्पष्टपणे दिसू शकणार आहे.

या व्हिडीओ डोअरफोनमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण फिचर्स आहेत. याची खासियत म्हणजे यात ‘इलेक्ट्रीक लॉक रिलीज’ ही नाविन्यपूर्ण सुविधा देण्यात आली आहे. याच्या मदतीने युजर घरात कुठेही असला तरी बाहेरीला व्यक्तीला आत घ्यायचे असल्यास आपला दरवाजा ‘अनलॉक’ करू शकणार आहे. घरात लहान मुले असल्यास त्यांच्या सुरक्षेसाठी यामध्ये ÷व्हॉइस चेंज हे फिचर देण्यात आले आहे. यामुळे त्या मुलांचा आवाज बाहेरीला व्यक्तीला एखाद्या मोठ्या माणासाप्रमाणे ऐकू जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here