नेटफ्लिक्सला आव्हान देणार झेंडर !

0

नेटफ्लिक्स या लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवेला आव्हान देण्यासाठी झेंडरने मुव्हीचेन या नावाने याच प्रकारची नवीन सेवा सुरू केली आहे.

सध्या नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम व्हिडीओ, हॉटस्टार आदींसारख्या व्हिडीओ ऑन डिमांड सेवा खूप लोकप्रिय झाल्या आहेत. यात आता झेंडर या लोकप्रिय ऑफलाईन फाईल शेअरिंग अ‍ॅपने मुव्हीचेन ही नवीन सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या अनुषंगाने झेंडरने नुकताच सोनी इंडिया कंपनीशी करार केला आहे. अर्थात सोनीकडे अधिकार असणारे सर्व चित्रपट यावर पाहता येणार आहेत. झेंडरने आधीच इरॉस, पीव्हीआर, यशराज फिल्म्स, शेमारू आणि व्हायकॉम-१८ या आघाडीच्या कंपन्यांशी सहकार्याचा करार केला आहे. यात आता सोनी इंडियाची भर पडल्यामुळे मुव्हीपासकडे असणार्‍या चित्रपटाच्या खजिन्यामध्ये भर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुव्हीचेन ही सेवा सर्वसामान्य भारतीयांच्या खिशाला परवडेल अशा प्रकारे लाँच करण्यात येणार आहे. या सेवेचा लाभ घेणार्‍यांना अल्प मूल्यात बॉलीवुड अथवा हॉलीवुडच्या नवनवीन चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे. याचे दर अगदी दहा रूपयांपासून सुरू होणारे असतील. अर्थात यासाठी महिन्याच्या सबस्क्रीप्शनची अट नसेल हे मानले जात आहे. विशेष करून शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील युजर्ससाठी झेंडरची ही सेवा कार्यरत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या माध्यमातून स्मार्टफोनवर चित्रपट पाहणार्‍यांच्या प्रमाणात वाढ होणार असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here