निस्सान कनेक्ट अ‍ॅप भारतात दाखल

0

निस्सान कंपनीने आपल्या भारतीय ग्राहकांना निस्सान कनेक्ट अ‍ॅप सादर केले असून यात विविध फिचर्सला प्रदान करण्यात आले आहे.

निस्सान कनेक्ट अ‍ॅप हे याच कंपनीच्या इंटिलेजियंट मोबिलिटी व्हिजनवर आधारित आहे. यात ५० पेक्षा जास्त फिचर्स प्रदान करण्यात आले असून कंपनीच्या ग्राहकांना तीन वर्षांचे मोफत सबस्क्रिप्शन देण्यात येत आहे. आता बहुतांश कारमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम प्रदान करण्यात येत आहे. यासाठी अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कार प्ले आदींसारख्या प्रणाली विकसित करण्यात आल्या आहेत. आणि याच्या कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासाठी निस्सान कनेक्ट अ‍ॅप हे अतिशय उपयुक्त असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. हे अ‍ॅप स्मार्टफोनला टेलीमॅटीक कंट्रोल युनिटच्या मदतीने कनेक्ट करता येते. रेनो-निस्सान कंपनीच्या भारतीय शाखेने या युनिटला विकसित केले आहे. या कंपनीच्या आगामी प्रत्येक मॉडेलमध्ये हे युनिट इनबिल्ट अवस्थेत देण्यात येणार असून प्रत्येकात सीमकार्ड व स्वतंत्र सर्व्हर प्रदान करण्यात येणार आहे.

निस्सान कनेक्ट अ‍ॅपमध्ये अनेक उपयुक्त फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यात कुणीही आपल्या कारचा अधिकतम वेग मर्यादा लाऊ शकतो. याच्या वर कारचा वेग गेल्यास संबंधीत युजरला स्मार्टफोनवर अलर्ट मिळण्याची सुविधा यात असेल. तसेच यात शॉफर ट्रॅकरदेखील असेल. यात विहीत परिघाच्या पलीकडे ड्रायव्हरने वाहन नेल्यास याची माहिती मिळू शकते. कर्फ्यु अलर्टच्या माध्यातून कार थोड्या वेळानंतर हलली तर याची माहितीदेखील मिळण्याची यात व्यवस्था आहे. याशिवाय या अ‍ॅपच्या मदतीने कार ड्रायव्हरला त्याच्या परफॉर्मन्सनुसार गुणांकन (स्कोअर कार्ड) प्रदान करण्याची व्यवस्थादेखील यात आहे. याच्या मदतीने कारच्या मायलेजची अचूक माहितीदेखील मिळेल. सध्या यात प्राथमिक स्वरूपाचे फिचर्स असले तरी लवकरच यात अधिक उच्च दर्जाचे फिचर्स देण्यात येतील असे कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे. होंडा, टोयोटा आणि महिंद्रासारख्या कंपन्यांनी आधीच अ‍ॅप सादर केले असून आता निस्सान कनेक्ट अ‍ॅप उपलब्ध करण्यात आले आहे हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here